Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 10:50 AM2024-11-24T10:50:11+5:302024-11-24T10:51:12+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे विजयी झाले आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : निवडणुकीत उद्धवसेनेला मोठा फटका बसला आहे. पक्षाने जागावाटपात जास्तीत जास्त जागा आपल्याकडे खेचल्या. तरीदेखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्षाला फक्त २० जागांवर समाधान मानावे वागले आहे. शरद पवार यांचा करिश्मा या निवडणुकीत चालू शकला नाही, असे या निकालांवरून दिसून येते. सहजी हार न मानणारे थोरले पवार या निकालांनी चांगलेच बॅकफूटवर आल्याचे दिसते. पुतण्याच्या गटाचे आव्हान झेलत त्यांनी १० जागा मिळाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे विजयी झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला यांचा दारुण पराभव केला. नजीब मुल्ला हे माजी नगरसेवक असून त्यांनी आव्हाड यांना आव्हान दिलं होतं. विजयानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. "खूप दु:ख होत आहे. संशयही आहे. सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही. मी पहिल्यादिवसापासून सांगतोय, कालही सांगत होतो आणि आजही सांगेन की, ईव्हीएम मशीनवर विश्वास ठेऊ नका" असं माध्यमांना प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात नजीब मुल्ला हे निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र या निवडणुकीत नजीब मुल्ला यांचा एक लाख मतांनी पराभव झाला आहे. जनतेने अजित पवार यांनाही भरभरून मतांचे दान दिले आहे. लोकसभेच्या निकालाने हादरून गेलेले अजित पवार विधानसभेला पूर्ण क्षमतेने, नव्या उमेदीने रिंगणात उतरले आणि विजयी झाले. अजित पवार त्यांच्या पद्धतीने निवडणुकीची व्यूहरचना केली. गुलाबी जॅकेटवर टीका झाली. पण सगळे अंदाज खोटे ठरवत त्यांनी बाजी मारली.