विचारे यांच्या उमेदवारीने ठाण्याची लढत झालीय रंगतदार
By अजित मांडके | Published: November 9, 2024 04:15 PM2024-11-09T16:15:47+5:302024-11-09T16:21:42+5:30
Maharashtra Assembly Election 2024: ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ ताब्यात राखण्यासाठी यावेळी भाजपला कसरत करावी लागणार की, सहजपणे भाजप ही लढाई जिंकणार, याची उत्सुकता आहे.
- अजित मांडके
ठाणे - ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ ताब्यात राखण्यासाठी यावेळी भाजपला कसरत करावी लागणार की, सहजपणे भाजप ही लढाई जिंकणार, याची उत्सुकता आहे. मागील निवडणुकीत भाजपचे संजय केळकर यांना मनसेचे आव्हान होते; परंतु आताच्या निवडणुकीत उद्धवसेनेकडून माजी खा. राजन विचारे यांना संधी दिल्याने येथील लढत आता रंगतदार होणार आहे.
२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत केळकर यांच्यासमोर मनसेचे अविनाश जाधव होते. त्यावेळेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उघडपणे तर शिवसेनेने छुपी मदत मनसेला केली होती. तरीसुद्धा केळकर यांनी जाधव यांचा २० हजार मतांनी पराभव केला. आता केळकर यांची लढत केवळ मनसेबरोबर नसून उद्धवसेनेचे राजन विचारे यांच्याशीसुद्धा असणार आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीला १ लाख २६ हजार ४३१ मते मिळाली. विचारे यांना ६६ हजार २६० मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत महायुती हे मताधिक्य राखते का? लोकसभेत मिळाली तेवढी किंवा त्यापेक्षा जास्त मते विचारे प्राप्त करतात का? मनसे केळकर की विचारे यापैकी कुणाची मते खाणार? यावर निकाल निश्चित होईल.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पार्किंगची समस्या असल्याने वाहतूककोंडी सुटू शकलेली नाही.
जुन्या धोकादायक इमारतीचा पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर
घोडबंदर भागात होणारी वाहतूककोंडी डोकेदुखी
या मतदारांचा कौल कुठे?
- २ लाख ६० हजारांच्या आसपास हिंदू मते आहेत. त्यातील ९५ हजारांच्या आसपास मराठा समाजाची मते आहेत आणि हीच मते या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
- ३दोन मराठा उमेदवार असल्याने मतदार नेमके कुणाला मतदान करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.