परवानगी द्या महाराजांचा पुतळा बांधून दाखवतो; जितेंद्र आव्हाडांचे फडणवीसांना आव्हान
By अजित मांडके | Published: November 6, 2024 03:16 PM2024-11-06T15:16:12+5:302024-11-06T15:16:51+5:30
देवेंद्र फडणवीस कधी मुंब्र्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांना मुंब्र्याची रचना माहीत नाही, देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला तर तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मुंब्र्यात पुतळा बांधून दाखवतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहेत.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: देवेंद्र फडणवीस कधी मुंब्र्यात आले नाहीत त्यामुळे त्यांना मुंब्र्याची रचना माहीत नाही, मुंब्र्याच्या वेशीवर असलेल्या शिल्पात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली, निधी दिला तर तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मुंब्र्यात पुतळा बांधून दाखवतो असे थेट आव्हान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराजांचा पुतळा उभारल्यावर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे लोकपर्ण करून दाखवतो असेही ते म्हणाले. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान केले होते की मुंब्र्यात शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारून दाखवा त्याला आता आव्हाड यांनी प्रतिउत्तर देत आव्हान दिले. का एखाद्या शहराला का एका धर्माला बदनाम करता असा सवालही त्यांनी केला. मी त्या ठिकाणचे प्रतिनिधित्व करतो जिथे ५० टक्के मुस्लिम आहे ५० टक्के हिंदू आहेत असेही ते म्हणाले. संविधान बाबत त्यांना छेडले असता जे राहुल गांधी यांनी संविधान दाखवले होते त्याचा रंग लाल का आहे याचा अर्थ त्यांनी यावेळी समजून सांगितला. लाल रंगाचा अर्थ प्रेम , हृदय , क्रांतीचा रंग लाल आहे असे ते म्हणाले. आमचं रक्त सळसळत आहे कारण तुम्ही संविधान बदलणार म्हणून या संविधानाचा रंग लाल आहे असं त्यांनी स्पष्ट केले. हृदयाचा रंग लाल आहे त्याचा काय नक्षलवाद्यांशी सम्बध आहे का, लहान पोरं सारखे खेळ वाटतात , उगाच मुब्र्याला बदनाम करु नका, स्टेशन च्या बाजूला सुंदर मंदिर बांधून दिले, राज ठाकरे म्हणाले जा मदर्स्या मधे मशीन गण मिळतील तुम्हाला हिंदूंना मुसलमानच नावाने भडकावयाचे आहे असेही ते म्हणाले.
चौकशी लावा मुंब्र्यात आणि प्रुव करून दाखवा तिथे बांगलादेशी आणि पाकिस्तानी राहतात, मुंब्र्यात टार्गेट करून साधायचं काय आहे असा सवाल त्यांनी राज याना केला, मी ठाण्यात अठ्ठावीस मंदिर बंधेलत पण मी कधी सांगत नाही बारामतीचा विकास शरद पवारांनी केला. अजित पवार यांनी जाहीर केलेल्या अहवालात बारामतीचा विकास आपण केला असा उल्लेख केला आहे यावर आव्हाड यांना छेडले असता बारामती चा विकास शरद पवार यांनी केला असल्याचे त्यानी स्पष्ट केले. अजित दादांचे योगदान नाकारत नाही, मात्र शरद पवार मायनस म्हणजे बारामती काहीही उरत नाही असेही ते म्हणाले. निवडणूकीतून शरद पवार माघार घेतील पण राजकारणातून त्यांना माघार घेता येणार नाही, शरीरामुळे ते आता बोलत असतील असेही ते म्हणाले. राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय आम्हाला विचारल्या शिवाय घेणार नाही.
लाडकी बहिण कोणाची आहे अजित दादांची आहे , मुख्यमंत्र्यांची आहे की देवा भाऊंची आहे की प्रत्येकाची एक एक आहे अशी खिल्ली त्यांनी उडवली. इथे पोलिसांचा पगार झाला नाही, पुढच्या महिन्यात शासकीय नोकरांच्या पगार होईल की नाही ते सांगता येत नाही केवळ घोषणांचा पाऊस पडायला काय लागत असा सवाल त्यांनी केला.