Maharashtra Election 2019: ठाणेकरांची मतदानाकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 05:13 AM2019-10-22T05:13:19+5:302019-10-22T06:52:17+5:30

Maharashtra Election 2019: भिवंडीत मनसे उमेदवाराची गाडी फोडली.

Maharashtra Election 2019: Back to Thanekar's Vote | Maharashtra Election 2019: ठाणेकरांची मतदानाकडे पाठ

Maharashtra Election 2019: ठाणेकरांची मतदानाकडे पाठ

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मतांची टक्केवारी वाढावी, याकरिता केलेल्या प्रयत्नानंतरही ठाणेकरांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचेच चित्र आहे. उच्चभ्रूंच्या वस्त्यांमधील मतदार अभावाने मतदानाला बाहेर पडले तर झोपडपट्ट्या, गावठाणांमधून तुलनेने अधिक मतदान झाले. मात्र लोकसभेला दिसला तेवढाही उत्साह विधानसभेला दिसला नाही. भिवंडीत मनसेच्या उमेदवाराच्या मोटारीची अनोळखी व्यक्तींनी केलेली तोडफोड व ठाण्यात मतदान केंद्रात झालेली शाईफेकीची घटना वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले.

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील निवडणूक रिंगणातील २१२ उमेदवारांचे नशीब ईव्हीएम मशीन्समध्ये सोमवारी लॉक झाले. २०१४ च्या निवडणुकीत ५९ लाख ९० हजार ७३४ मतदारांपैकी ५०.६१ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला होता. यावेळी मतांची टक्केवारी त्याच्याच आसपास राहण्याची चिन्हे आहेत.

भिवंडी पूर्वचे मनसेचे उमेदवार मनोज गुळवी यांच्या गाडीची रविवारी रात्री अनोळखी व्यक्तींनी तोडफोड केली. सोमवारी ठाण्यातील एका मतदानकेंद्रावर बहुजन नेते सुनील खांबे यांनी केलेली शाईफेकीची घटना आणि मतदानयंत्रातील बिघाडाचे काही प्रकार वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान झाले.

यंदाच्या निवडणुकीत ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित होते. गेले दोन दिवस ठाण्यात पाऊस पडत होता. पण सोमवारी चक्क ऊन पडले होते. मात्र तरीही घोडबंदर रोड व तत्सम उच्चभ्रू वस्त्यांमधील मतदान केंद्रावर तुरळक मतदार आढळले. त्याचवेळी मुंब्रासारख्या परिसरातील मतदान केंद्रांवर गर्दी होती.

मात्र तेथील अनेक मतदारांकडे तीन- तीन ओळखपत्रे मागितली जात असल्याने मतदारांमध्ये नाराजी होती. रविवारला जोडून मतदान असल्याने काही मतदारांनी चक्क पर्यटनस्थळ गाठले होते. त्यामुळे शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे कट्टर मतदार तेवढेच मतदानाला घराबाहेर पडल्याचे चित्र होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत जेमतेम चार ते पाच टक्के मतदान झाले असल्याने अनेक उमेदवार, त्यांचे कुटुंबीय व कार्यकर्ते वेगवेगळ््या विभागात जाऊन मतदारांना मतदानाकरिता घराबाहेर पडण्याची विनंती करीत होेते.
जिल्ह्यात सर्वपक्षीय नेते, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह मराठी मालिका आणि चित्रपटातील अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला व मतदानाचे आवाहन केले. मात्र तरीही जवळपास निम्मे ठाणेकर मतदार घरातून बाहेर पडले नाहीत.

रायगडच्या ग्रामीण भागांत मतदारांचा चांगला प्रतिसाद

अलिबाग : शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांनी दाखविवेल्या उत्साहामुळे रायगड जिल्ह्याचा मतदानाच टक्का ६५ टक्क्यांवर गेला. तो मागील वर्षीच्या तुलनेत घटलेला आहे. काही दिवस पाऊस पडत असल्याने मतदानाच्या दिवशी पाऊस खोळंबा करणार, अशी चिंता उमेदवार- कार्यकर्त्यांना होती. मात्र पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने मतदारांना विनाव्यत्यय घराबाहेर पडून मतदान करता आले. दुपारी उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्याने मतदारांना जोर थोडा कमी झाला.

उन्हे उतरताच पुन्हा मतदान वाढले. रेवस-बोडणी परिसरातील मासेमारी करण्यासाठी गेलेले मासेमार रविवारी सायंकाळीच मतदानासाठी परतले होते. त्यामुळे किनाऱ्याला सुमारे ५०० बोटी नांगरुन ठेवल्या होत्या. अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या मतदारसंघातील चाकरमानीही रविवारीच परतले होते.

Web Title: Maharashtra Election 2019: Back to Thanekar's Vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.