Maharashtra Election 2019 : मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे वारे, गीता जैन अपक्ष लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 01:34 AM2019-10-04T01:34:09+5:302019-10-04T01:35:01+5:30

मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेले विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनीदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे.

Maharashtra Election 2019: BJP rebels in Meera-Bhayandar constituency, Geeta Jain will contest independently | Maharashtra Election 2019 : मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे वारे, गीता जैन अपक्ष लढणार

Maharashtra Election 2019 : मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे वारे, गीता जैन अपक्ष लढणार

Next

मीरा रोड : मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातून भाजपने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या जवळचे असलेले विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिल्याने भाजपच्या माजी महापौर गीता जैन यांनीदेखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी चालवली आहे. शुक्रवारी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपचे पॅनल असूनही गीता जैन यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला होता. तरीदेखील जैन यांनी भार्इंदर पश्चिम येथील प्रभाग ६ मधून तब्बल नऊ हजार ९०० मते मिळवली होती. पालिका निवडणुकीत सर्वात जास्त मते मिळवणाऱ्या त्या उमेदवार ठरल्या. जैन यांनी मेहतांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे जैन यांच्यावर सोशल मीडियावरून अपशब्दांत टिप्पणी करण्यासह त्यांचे जाहिरात फलक काढणे, त्यांच्या नवरात्रीचा कार्यक्रम बंद करायला लावणे, पक्षाच्या बैठकांना न बोलावणे आदी प्रकार नागरिकांनी अनुभवले आहेत.

जैन यांनी विधानसभा निवडणुकीची त्या २०१५ साली महापौर असतानापासूनच तयारी चालवली होती. उमेदवारीसाठी त्यांनी राज्यातल्या नेत्यांपासून दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी चालवल्या होत्या. परंतु, अपेक्षेप्रमाणे मेहतांना उमेदवारी मिळाल्याने आता जैन यांच्यासमोर अपक्ष म्हणून उभे राहण्याचा वा अन्य पक्षात जाण्याचा पर्याय असल्याचे जाणकारांचे मत आहे.
जैन यांनी अद्याप आपले पत्ते खुले केले नसले, तरी शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणे निश्चित असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मेहतांना ए-बी फॉर्म दिले असले तरी जैन यांचे भाजपची उमेदवारी मिळवण्याचे प्रयत्न सुरूच असून, शेवटच्या क्षणी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची त्यांची तयारी आहे. जैन यांची उमेदवारी मेहतांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे मानले जात आहे.

गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या भूमिकेकडे लक्ष

माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी अजूनही आपली भूमिका उघड केलेली नाही. काँग्रेस आघाडीकडून माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. मेंडोन्सा यांनी जैन वा मुझफ्फर यांच्या बाजूने मैदानात उडी घेतली तर, मेहतांची डोकेदुखी वाढणार, हे निश्चित. त्यातही मुझफ्फर यांचे मीरा रोडमधील मतदारांशी असलेले व्यक्तिगत संबंध, उत्तनसह भार्इंदरच्या एखाद्या भागातील काँग्रेसची ताकद पाहता लढत ही तिरंगी ठरणार आहे.
 

Web Title: Maharashtra Election 2019: BJP rebels in Meera-Bhayandar constituency, Geeta Jain will contest independently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.