Maharashtra Election 2019: मुलासाठी आईची माघार; मुलगा आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 12:26 PM2019-10-07T12:26:10+5:302019-10-07T12:27:37+5:30

Maharashtra Election 2019 मुलासाठी आमदार आई अर्ज मागे घेण्याच्या तयारीत

maharashtra election 2019 jyoti kalani likely to cancel her candidature for omi kalani | Maharashtra Election 2019: मुलासाठी आईची माघार; मुलगा आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढणार

Maharashtra Election 2019: मुलासाठी आईची माघार; मुलगा आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष लढणार

Next

- सदानंद नाईक

उल्हासनगर : वडील गणेश नाईक यांच्यासाठी त्यांचे पुत्र संदीप नाईक यांनी ऐरोली मतदारसंघातून माघार घेतल्यानंतर, ठाण्यातील उल्हासनगर मतदारसंघात आई आ. ज्योती कलानी या त्यांचा पुत्र ओमी कलानी यांच्यासाठी माघार घेण्याची शक्यता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे ओमी कलानी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, याबाबत टीम ओमी कलानीच्या कोअर कमिटीचा अंतिम निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले.

उल्हासनगर मतदारसंघातून ओमी टीमच्या महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यानंतर, ओमी कलानी व आमदार ज्योती कलानी यांनी पंचम कलानी यांचा धूमधडाक्यात प्रचारही सुरू केला होता. तत्पूर्वी, आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवसांपूर्वी पंचम कलानी यांच्याऐवजी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष, माजी आमदार कुमार आयलानी यांना भाजपने उमेदवारी घोषित केली. त्यामुळे कलानी कुटुंब संतप्त झाले. त्यानंतर, ज्योती कलानी यांनी एका रात्रीत राष्ट्रवादीचा एबी फॉर्म आणून उमेदवारी अर्ज दाखल केला. ओमी कलानी यांनीही अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला.

ओमी कलानी यांच्या रॅलीत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतिया, प्रमोद टाले आदी उपस्थित होते. अर्ज छाननीत राष्ट्रवादीतर्फे ज्योती कलानी तर ओमी कलानी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात राहिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्येतीचे कारण पुढे करून ज्योती कलानी अर्ज मागे घेणार असून, ओमी कलानी यांना रिंगणात उतरविण्यात येणार आहे.

कलानी कुटुंबाचा राष्ट्रवादीसोबत खेळ - गंगोत्री
उल्हासनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाने माझे नाव घोषित केले. पक्षाचा एबी फॉर्म देऊन अर्जही दाखल करण्यास सांगितले. मात्र, दुसऱ्या दिवशी भाजपने घरचा रस्ता दाखविलेल्या कलानी कुटुंबाने राष्ट्रवादीचा एबी फॉर्म आणून माझ्यापूर्वी अर्ज दाखल केला. आता राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार ज्योती कलानी माघार घेऊन ओमी कलानी यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरविणार आहेत. आघाडीचा पाठिंबा मिळविण्यातही ते यशस्वी होऊ शकतात. एकूणच कलानी कुटुंब राष्ट्रवादीसोबत खेळत असल्याची टीका या पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी केली आहे.

Web Title: maharashtra election 2019 jyoti kalani likely to cancel her candidature for omi kalani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.