Maharashtra Election 2019: भरपावसात केळकर यांची प्रचाररॅली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 01:25 AM2019-10-20T01:25:00+5:302019-10-20T01:26:47+5:30
तरुणांनीही पावसातच काढली बाइकरॅली
ठाणे : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ठाणे विधानसभेचे भाजपचे उमेदवार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी ब्रह्मांडपासून बाइकरॅली काढण्यात आली. तीमध्ये मोठ्या संख्येने बाइकस्वार सहभागी झाले होते. तिच्या माध्यमातून केळकर यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी केले.
यावेळी आमदार निरंजन डावखरे, शहराध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक मनोहर डुंबरे, नगरसेविका कविता पाटील, मृणाल पेंडसे, अर्चना मणेरा, साधना जोशी, कमल चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील, शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहरप्रमुख हेमंत पवार, निलेश कोळी यासोबत भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ब्रह्मांड फेज ६ इथून या बाइकरॅलीला सुरु वात झाली. त्यानंतर ती टीसीएस, रोडाज, हिरानंदानी इस्टेट, ऋ तू इस्टेट, रेम्बो स्कूल, आझादनगर, त्यानंतर राबोडी, वृंदावन, मीनाताई ठाकरे चौकापासून पुढे, नौपाडा आणि घंटाळी मैदानामध्ये तिचा समारोप करण्यात आला. सहभागी झालेले बाइकस्वार शेवटपर्यंत उपस्थित होते.
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजप उमेदवार संजय केळकर यांनी शुक्रवारी फेरीत चंदनवाडी आणि रायगडगल्लीत प्रचारफेरी काढली. याच परिसरातील प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेले इमारतीचे ना-हरकत प्रमाणपत्र हे स्वत: केळकर यांनी नागरिकांना आणि सोसायट्यांना मिळवून दिल्याचे आभार मतदारांनी मानले. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पाचपाखाडी येथील रायगडगल्लीच्या शिवसेना शाखेपासून सुरू होऊन पोखरण रोड नं.१, रमाबाईनगर येथून स्थानिक नगरसेवक अशोक राऊळ यांच्या सिद्धेश्वर कार्यालयाजवळ प्रचाररॅलीचा समारोप करण्यात आला.