Maharashtra Election 2019:मतदारराजा आज देणार महाकौल! राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघ २१३ उमेदवार रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 04:40 AM2019-10-21T04:40:28+5:302019-10-21T06:39:40+5:30

Thane Vidhan Sabha Election 2019: विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे.

Maharashtra Election 2019: In the most Thane district in the state, 18 constituencies and 213 candidates are in the fray | Maharashtra Election 2019:मतदारराजा आज देणार महाकौल! राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघ २१३ उमेदवार रिंगणात

Maharashtra Election 2019:मतदारराजा आज देणार महाकौल! राज्यात सर्वाधिक ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघ २१३ उमेदवार रिंगणात

googlenewsNext

ठाणे: विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील १८ मतदारसंघांसाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. १८ मतदारसंघांतून २१३ उमेदवार नशीब आजमावत आहेत. २१ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू होती. तेव्हापासून तिचे कडेकोट पालन प्रशासनाने केले आहे. या काळात २५ गुन्हे दाखल झाले आहेत. दोनकोटी ३६ लाखांहून अधिक रक्कम जप्त केली असून ४० लाखांहून अधिक किमतीचे मद्यही जप्त केले आहे. शिवाय, दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून ६८ गुंडांना तडीपार केले आहे. जिल्ह्यात ६३ लाख ९२ हजार ३५७ मतदार असून त्यासाठी २९ हजार कर्मचारी तैनात केले आहेत. ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी वाहनांची सोय केली आहे.

कडेकोट बंदोबस्त

९१०८ स्थानिक पोलीस, ३५२६ होमगाडर््स, १८ केंद्रीय तसेच राज्य राखीव दलाच्या तुकड्या, फोर्स, दौंड-धुळ्यावरून अतिरिक्त पोलीस बळ, नवी मुंबई पोलीसही मदतीला, रात्रंदिवस गस्त, आकस्मिक नाकेबंदी

जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणार
मतदानप्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदानकेंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत ठिकठिकाणच्या स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.

किती उमेदवार?

मतदारसंघ- उमेदवार- मतदार

भिवंडी ग्रामीण - उमेदवार- 07,  मतदार- 289298 

शहापूर-  उमेदवार- 07, मतदार- 249278

भिवंडी पश्चिम- उमेदवार- 07, मतदार-  275843

भिवंडी पूर्व- उमेदवार- 14,  मतदार- 269923

कल्याण पश्चिम- उमेदवार- 17, मतदार- 452796

मुरबाड- उमेदवार-  07, मतदार- 397869

अंबरनाथ- उमेदवार- 17,  मतदार- 315482

उल्हासनगर- उमेदवार- 18, मतदार- 233222

कल्याण पूर्व- उमेदवार-  19,  मतदार- 345666

मतदारसंघ उमेदवार मतदार

डोंबिवली - उमेदवार-  06,  मतदार-  356018

कल्याण ग्रामीण - उमेदवार- 12, मतदार-  424913

मीरा-भाईंदर - उमेदवार- 12,  मतदार-  437144

ओवळा-माजिवडा - उमेदवार- 14,  मतदार- 449602

कोपरी-पाचपाखाडी- उमेदवार-  11,  मतदार-  352858

ठाणे शहर- उमेदवार-  05, मतदार- 337721

मुंब्रा-कळवा- उमेदवार- 11, मतदार- 357493

ऐरोली- उमेदवार- 11,  मतदार- 461349

बेलापूर- उमेदवार-  17,  मतदार- 385882

मतदानासाठी ‘सुटी’ जाहीर

सर्व आस्थापना सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळात बंद ठेवण्यात येतील. त्या दिवशी बंद राहिलेली दुकाने, आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नाही, असे सहायक कामगार आयुक्त यांनी कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुटीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनामालकांनी घेणे आवश्यक राहील.

Web Title: Maharashtra Election 2019: In the most Thane district in the state, 18 constituencies and 213 candidates are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.