शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी, राज ठाकरेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 05:28 PM2019-10-19T17:28:22+5:302019-10-19T17:33:12+5:30
Mahrashtra Election 2019 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या विचारावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे.
ठाणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या विचारावर मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे. शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणार, यासारखा दिवाळखोरी विचार कुठलाही नाही, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांची यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील शेवटची प्रचारसभा आज ठाण्यात झाली. ठाणे शहरमधील मनसे उमेदवार अविनाश जाधव यांच्यासह पक्षाच्या इतर उमेदवारांना निवडून देण्याचा आवाहन करताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसमारंभांसाठी भाड्याने देण्याचा विचार करत असलेल्या राज्य सरकारवर राज ठाकरे यांनी टीकेची तोफ डागली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे आयोजित होणे म्हणजे दिवाळखोरी विचार आहे. तोफ राज ठाकरे यांनी डागली. तसेच एवढे होऊनही महाराष्ट्र थंड आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
यावेळी राज ठाकरे यांनी कलम ३७० वरूनही भाजपावर निशाणा साधला. कलम ३७० चा महाराष्ट्रातील निवडणुकीशी काय संबंध? असा सवाल त्यांनी विचारला. ठाण्यातील भाड्याच्या घरात राहणारी माणसं हक्काच्या घरात कधी जाणार? खुल्या प्रवर्गातील मुलांना इंजिनियरिंग मेडिकलसाठी प्रवेश कधी मिळणार ते सांगा, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.