Maharashtra Election 2019: मुंब्रा-कळव्यात वाढलेल्या २.४८ टक्के मतदानाचा फायदा कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 02:15 AM2019-10-23T02:15:07+5:302019-10-23T06:24:10+5:30

Maharashtra Election 2019: शिवसैनिक उतरलेच नाहीत; आव्हाडांची हॅट्ट्रिक होणार काय?

Maharashtra Election 2019: Who gets the benefit of the voting percentage of Mumbra-Kalva? | Maharashtra Election 2019: मुंब्रा-कळव्यात वाढलेल्या २.४८ टक्के मतदानाचा फायदा कोणाला?

Maharashtra Election 2019: मुंब्रा-कळव्यात वाढलेल्या २.४८ टक्के मतदानाचा फायदा कोणाला?

Next

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा - कळवा या मतदार संघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचे हॅट्ट्रिकसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून त्यांची लढत शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांच्याशी होत आहे. या मतदारसंघात यंदा मतदानाची टक्केवारी ही २.४८ टक्यांनी वाढली आहे. यंदा येथे ४९.९६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

वास्तविक पाहता या मतदारसंघात झालेल्या विकास कामांच्या जोरावर या मतांची टक्केवारी आणखी वाढेल, अशी वाटत होती. मात्र, ती आशा फोल ठरली का?, शिवसेनेच्या मतदारांनी दीपाली सय्यद यांना नाकारले का? अशीदेखील चर्चा असून त्यामुळेच मतांची टक्केवारी दोन टक्यांनी वाढली असली तरी त्याचे परिणाम फार काही जास्त प्रमाणात होतील असे दिसत नाही.

२०१४ मध्ये या मतदारसंघात ४७.४८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. समाजवादी, एमआयएम या निवडणुकीत बाहेर आहे. परंतु, एमआयएमने ‘आप’ ला टाळी दिली असल्याने त्याचा किती परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत ३ लाख ४८ हजार ४११ मतदात्यांपैकी १ लाख ६५ हजार ४२७ मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पैकी ९२ हजार ४५५ पुरुष आणि ७२ हजार ९७२ स्त्री मतदारांनी येथे मतदान केले होते. यंदा या मतदारसंघात ३ लाख ५७ हजार ४९३ मतदार होते. त्यापैकी १ लाख १५९ पुरुष आणि ७८ हजार ४३१ स्त्री मतदार असे मिळून एकूण १ लाख ७८ हजार ५९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

इतर मतदारसंघांच्या तुलनेत दोन टक्क्यांची वाढ

यंदाच्या निवडणुकीत सेनेने स्थानिकांना डावलून दीपाली भोसले- सय्यद हा सेलेब्रीटी चेहरा या मतदारसंघात दिला. इच्छुक शिवसैनिकांमध्ये त्यामुळे नाराजी होती. परिणामी शिवसेनेचे मतदार जास्त प्रमाणात बाहेर पडले नाही.

जितेंद्र आव्हाडांनाही मतांची टक्केवारी फारशी वाढविता आली नाही. ठाण्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात २ टक्के का होईना मतदान वाढले असल्याने ती निर्णायक ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019: Who gets the benefit of the voting percentage of Mumbra-Kalva?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.