आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली ठाण्याच्या शिवसैनिकांनी, प्रताप सरनाईकांची महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 01:30 AM2019-11-27T01:30:07+5:302019-11-27T01:30:47+5:30

सत्तेची समीकरणे जुळत आली असताना अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना विश्वास दाखविणे महत्वाचे होते.

Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena of Thane takes responsibility for the security of MLAs | आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली ठाण्याच्या शिवसैनिकांनी, प्रताप सरनाईकांची महत्त्वाची भूमिका

आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली ठाण्याच्या शिवसैनिकांनी, प्रताप सरनाईकांची महत्त्वाची भूमिका

Next

ठाणे : सत्तेची समीकरणे जुळत आली असताना अचानक झालेल्या नाट्यमय घडामोडीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांना विश्वास दाखविणे महत्वाचे होते. यासाठी ठाण्यातील शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली होती. तर आमदार फुटू नयेत म्हणून त्यांच्या राहण्याची, हॉटेलची व्यवस्था, सुरक्षा, त्यांना कोण भेटायला येतो, कोणाला भेटू द्यायचे, कोणाला भेट देऊ नये, खाणे, पिणे या सर्वांची जबाबदारी मुंबईतील शिवसैनिकांबरोबरच ठाण्यातील शिवसैनिकांवरही होती. त्यांनी हे काम चोख बजावल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये महत्त्वाचे योगदान शिंदे, आव्हाड यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील आठवड्यात अचानक भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आपल्या ताफ्यात घेऊन पहाटेच सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाआघाडीची गणितं फिसकटली होती. परंतु, येथेदेखील कुठेही न डगमगता, आमदारांना विश्वासात घेऊन या तीनही पक्षांनी रणनिती निश्चित केली. यामध्ये शिवसेनेवर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. पळालेल्या आमदारांना शोधून आणण्यापासून त्यांची हॉटेलमधील व्यवस्था, राहणे, खाणे, पिणे आदींच्या व्यवस्था करण्याचे कामही शिवसेनेकडे सोपविण्यात आले होते.

शिवसेनेने आपली ही भूमिका चोख पार पाडल्याचे दिसून आले आहे. एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरदेखील या तीनही पक्षांची जबाबदारी होती. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरच महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राष्टÑवादीच्या आमदारांना एका हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये नेणे, त्यांच्या राहण्याची, त्यांना काय हवे आहे, काय नको, या सर्वांची जबाबदार विहंग सरनाईक आणि त्यांच्या टीमवर होती. दुसरीकडे पूर्वेश सरनाईक यांच्यावर काँग्रेसच्या आमदारांची सोपविण्यात आली होती. त्यांच्याबरोबर वरुण सरदेसाई आणि युवा सेनेची कोअर कमिटी काम पाहत होती. ही मंडळी काँग्रेसच्या आमदारांना हॉटेलमधून, ने-आण करणे, राहण्याची इतर सोयीसुविधेची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर शिवसेना आणि अपक्ष आमदारांच्या वास्तव्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

१५० जणांची टीम होती तैनात

विशेष म्हणजे या तीनही पक्षांच्या सुरक्षेसाठी त्यांना कोण भेटायला येतो, कोणाला भेटण्यास सोडायचे कोणाला सोडू नये यासाठी मुंबई, ठाणे आणि मीरा भार्इंदरमधील शिवसेनेची १५० जणांची टीम काम पाहत होती.
एकूणच एकही आमदार फुटू नये यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रत्येक जण जबाबदारी घेत असताना इतर मंडळीवरदेखील अशा प्रकारे महत्वाच्या जबाबदाºया सोपविण्यात आल्या होत्या.

जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आगरी जेवण
हॉटेलचे जेवण खाण्यापेक्षा शिवसेना आणि अपक्ष आमदारांसाठी रोज दुपार आणि रात्रीचे जेवण ठाण्यातूनच जात होते,अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये घोडबंदर भागातील आगरी कट्टा या हॉटेलमधून रोजच्या रोज घरगुती जेवण देण्याची जबाबादरी सरनाईक यांच्यावर सोपविण्यात आली होती.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra Government: Shiv Sena of Thane takes responsibility for the security of MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.