Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेसह भाजपालाही दणका; मनसेने फडकवली विजयी पताका
By मुकेश चव्हाण | Published: January 18, 2021 01:01 PM2021-01-18T13:01:35+5:302021-01-18T13:08:08+5:30
काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे.
मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. या निकालाची आता लाखो उमेदवारांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. काकोळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची होती. या ग्रामपंचायतीवर एकूण सात सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.
आपले 'मनसे'; अभिनंदन! 💐✌️💐
घासून नाय, तर विरोधकांची ठासून! सरपंच मनसेचा, विकास सर्वांचा! अंबरनाथ मधील काकोळी ग्रामपंचायत मधील ०७ पैकी ०४ सदस्य विजयी! #RajThackeray #MNS #मनसेवृत्तांत
Posted by मनसे वृत्तांत अधिकृत on Sunday, 17 January 2021
त्यातील मनसेचे नरेश गायकर, सुरेखा गायकर, रेश्मा गायकर आणि जयश्री गायकर यांनी विजय मिळवत ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकवला आहे. तसेच रत्नागिरीच्या दापोलीत देखील मनसेने खातं उघडलं आहे. दापोलीतील नवशी ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे उपतालुकाध्यक्ष मिलिंद गोरीवले यांचा विजय झाला आहे.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी दोन लाख ५० हजार १६८ जणांना मतदानाचा हक्क मिळाला होता. यात एक लाख ३१ हजार ९१६ पुरुषांसह एक लाख १८ हजार २५० महिला मतदार होते. या मतदानापैकी ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. शेवटच्या टप्प्यातील मतदानाची आकडेवारी मिळण्यास रात्री उशिर होणार आहे; परंतु शेवटच्या दीड तासात म्हणजे ५.३० वाजेपर्यंत साडेचार ते पाच टक्क्यांच्या अंदाजासह जिल्हाभरात ८० टक्के मतदानाचा अंदाज तहलीलदार राजेंद्र तवटे यांनी व्यक्त केला.
तालुकानिहाय मतदान
तालुका ग्रा.पं. मतदान टक्केवारी
मुरबाड ३९ २३०४२ ७०.७२
अंबरनाथ २६ २७,७७१ ७४.७६
भिवंडी ५३ ८९,८५५ ७५.४४
कल्याण २० ३२,०८३ ६०.६०
शहापूर ५ ५८६२ ६७.००