THane: ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांनी भरला उमेदवारी अर्ज
By अजित मांडके | Published: April 29, 2024 01:20 PM2024-04-29T13:20:45+5:302024-04-29T13:21:33+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शक्तीस्थळ ते ठाणे बाजारपेठ काँग्रेस ऑफिस वरून वळसा मारून शिवाजी मैदान अशी रॅली काढून शक्ती प्रर्दशन केले.
- अजित मांडके
ठाणे - ठाणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शक्तीस्थळ ते ठाणे बाजारपेठ काँग्रेस ऑफिस वरून वळसा मारून शिवाजी मैदान अशी रॅली काढून शक्ती प्रर्दशन केले.
ठाणे लोकसभा मतदार संघातून उद्धव सेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचारे यांनी साडे अकरा वाजता सर्वात प्रथम स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील समाधीस्थळाला भेट देऊन त्यांचे आर्शिवाद घेतले.त्यानंतर त्यानंतर तेथूनच एक रॅली काढण्यात आली.या रॅलीत जांभळी नाका परिसरात शिवसेनानेने युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, हे सामील झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, काँग्रेसचे शहरअध्यक्ष विक्रांत चव्हाण हे उपस्थित होते.या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते. दुपारी साडे बारा च्या मुहुर्तावर विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे, मुलगी लतिका विचारे, धनश्री विचारे हे उपस्थित होते.