ठाणे, कल्याणमध्ये नऊ उमेदवारी अर्ज दाखल; ३१ अर्ज वाटप
By सुरेश लोखंडे | Published: April 30, 2024 06:26 PM2024-04-30T18:26:59+5:302024-04-30T18:28:11+5:30
Maharashtra lok sabha election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. तर आज पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. तर आज पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. याप्रमाणेच कल्याणसाठी आजच्या तिसऱ्या दिवशी तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाले. १२ जणांनी एकूण २६ अर्ज आज घेतले आहेत.
ठाणे लाेकसभेसाठी दाखल केलेल्या अर्जामध्ये सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे उमेदवार सुभाषचंद्र झा, भारतीय राजनितीक विकल्प पक्षाचे उमेदवार सुरेंद्रकुमार के जैन, आधार समाज पार्टीच्या उमेदवार अर्चना दिनकर गायकवाड, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार राहूल मेहरोलिया, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार चंद्रकांत सोनावणे, डॉ पियूष के. सक्सेना यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.त र आज वाटप झालेल्या पाच नामनिर्देशन पत्रांपैकी दाेन अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतले आहे. आझाद समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि अपक्ष आदी प्रत्येकाने एक अर्ज घेतला आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आजच्या तिसऱ्या दिवशी तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाले. अपक्ष राकेश जैन, उध्दव सेनेच्या वैशाली राणे आणि अपक्ष शिवा कृष्णमूर्ती अय्यर आदींनी अर्ज दाखल केले. तर आज १२ जणांनी एकूण २६ अर्ज आज घेतले आहेत. यामध्ये अपक्ष १४ असून वंचित बहुजन आघाडी, संयुक्त भारत पक्ष यांनी प्रत्येकी चार अर्ज घेतले आहे. तर अमन समाज पार्टीने दाेन अर्ज घेतले असून उद्धव शिवसेना व बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी आदींनी प्रत्येकी एक अर्ज घेतला आहे.