राजन विचारे आमच्या मुळे जिंकले होते, नरेश म्हस्के यांचा दावा
By धीरज परब | Published: May 5, 2024 12:55 PM2024-05-05T12:55:20+5:302024-05-05T12:56:21+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: राजन विचारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आमदार राजन विचारे , गीता जैन , रवींद्र फाटक , हेमंत म्हात्रे , ऍड रवी व्यास आदींसह माझ्या व कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभा निवडणूक जिंकले होते . आता त्यांना या पैकी कोणाचाही पाठिंबा नसल्याने त्यांनी यंदा जिंकून दाखवावे असे आव्हान ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी दिले.
मीरारोड - ह्या आधीच्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , आमदार राजन विचारे , गीता जैन , रवींद्र फाटक , हेमंत म्हात्रे , ऍड रवी व्यास आदींसह माझ्या व कार्यकर्त्यांच्या बळावर लोकसभा निवडणूक जिंकले होते . आता त्यांना या पैकी कोणाचाही पाठिंबा नसल्याने त्यांनी यंदा जिंकून दाखवावे असे आव्हान ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी दिले.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या मीरारोड कार्यालयात शनिवारी रात्री झालेल्या पदाधिकारी बैठकीसाठी म्हस्के आले होते . यावेळी आ . सरनाईक सह आमदार गीता जैन, माजी आमदार रवींद्र फाटक , भाजपा ठाणे विभागाचे संघटन मंत्री हेमंत म्हात्रे , भाजपा मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख ऍड . रवी व्यास , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अरुण कदम , आरपीआयचे देवेंद्र शेलेकर , शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजू भोईर व विधानसभा क्षेत्र प्रमुख विक्रमप्रताप सिंह आणि सचिन मांजरेकर सह माजी नगरसेविका भावना भोईर , संध्या पाटील , वंदना पाटील , जिल्हासंघटक निशा नार्वेकर आदी उपस्थित होते.
शहरातील शिलोत्र्यांच्या मिठागर जमिनीचा मालकी हक्क देणे , मिठागराच्या जागेवरील नेहरू नगर , शास्त्री नगर सारख्या तसेच शासकीय जमिनीवरील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे , भाईंदर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवणे व भाईंदर व मीरारोड स्थानके सर्व सुविधा युक्त बनवणे , आयटी पार्क , इस्टेट इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न आदी विविध मुद्यांवर दोन्ही स्थानिक आमदारांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
ह्या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा व माजी आमदार नरेंद्र मेहता मात्र अनुपस्थित असल्या बद्दल नेत्यांना प्रश्न करण्यात आला . त्यांना निमंत्रण दिले होते परंतु ते दुसऱ्या कामात व्यस्त असल्याने येऊ शकले नाहीत असे सांगण्यात आले .