ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान
By सुरेश लोखंडे | Published: May 21, 2024 08:07 PM2024-05-21T20:07:59+5:302024-05-21T20:08:24+5:30
Maharashtra lok sabha election 2024 : 25 लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.
ठाणे - ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे 2024 रोजी पार पडले. 25 लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाली असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये- धुळे यांनी दिली.
25 ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 52.09 टक्के मतदान झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 53.22 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 50.79 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 17.39 टक्के इतके आहे.
ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-
145 मिरा भाईंदर : एकूण मतदारांची संख्या : 04 लाख57 हजार 359 पैकी 02 लाख 23 हजार 898 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 48.95 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 42 हजार 966, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 21 हजार 535, महिला मतदार : 02 लाख 14 हजार 389, मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 02 हजार 363, इतर मतदार :04 मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 0.
146 ओवळा माजिवडा : एकूण मतदारांची संख्या : 05 लाख 09 हजार 227, पैकी 02 लाख 58 हजार 255 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 50.72 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 73 हजार 272, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 42 हजार 464, महिला मतदार : 02 लाख 35 हजार 928 मतदान केलेल्या महिला मतदार : 01 लाख 15 हजार 788 , इतर मतदार : 27, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 03.
147 कोपरी पाचपाखाडी : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 28 हजार 054, पैकी 01 लाख 84 हजार 522 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 56.25 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 75 हजार 561, मतदान केलेले पुरुष मतदार :01 लाख 01 हजार 488, महिला मतदार : 01 लाख 52 हजार 472, मतदान केलेल्या महिला मतदार : 83 हजार 026, इतर मतदार : 21, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 08.
ठाणे : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 57 हजार 545 पैकी 02 लाख 12 हजार 801 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 59.52 %.) पुरुष मतदार संख्या : 01 लाख 85 हजार 857, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 13 हजार 095, महिला मतदार : 01 लाख 71 हजार 681, मतदान केलेल्या महिला मतदार : 99 हजार 704, इतर मतदार : 07, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 02.
150 ऐरोली : एकूण मतदारांची संख्या : 04 लाख 57 हजार 456, पैकी 02 लाख 21 हजार 749 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 48.47 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 57 हजार 611, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 27 हजार 068, महिला मतदार : 01 लाख 99 हजार 715, मतदान केलेल्या महिला मतदार : 94 हजार 661, इतर मतदार : 130, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 20.
151 बेलापूर : एकूण मतदारांची संख्या : 03 लाख 97 हजार 731, पैकी 02 लाख 04 हजार 969 मतदारांनी मतदान केले. (एकूण टक्केवारी 51.53 %.) पुरुष मतदार संख्या : 02 लाख 12 हजार 896, मतदान केलेले पुरुष मतदार : 01 लाख 11 हजार 860, महिला मतदार : 01 लाख 84 हजार 817, मतदान केलेल्या महिला मतदार : 93 हजार 106 , इतर मतदार : 18, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 03.