Vidhan Sabha 2019: पराभव चाखलेले नऊ आमदार यावेळी सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:58 AM2019-09-23T00:58:22+5:302019-09-23T00:58:57+5:30

‘त्या’ माजी आमदारांमध्ये गणेश नाईक, दौलत दरोडा, गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा समावेश

Maharashtra Vidhan Sabha 2019 Nine legislators ready for defeat this time! | Vidhan Sabha 2019: पराभव चाखलेले नऊ आमदार यावेळी सज्ज!

Vidhan Sabha 2019: पराभव चाखलेले नऊ आमदार यावेळी सज्ज!

Next

- सुरेश लोखंडे 

ठाणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या निवडणुकीकडे दृष्टिक्षेप टाकला असता जिल्ह्यातील तत्कालीन नऊ आमदारांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती. या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत ते आहेत.

जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होत आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह नऊ माजी आमदार या निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. या माजी आमदारांना निवडणूक रिंगणात उतरवल्यास, ते विजयश्री मिळवतील की नाही, याची चाचपणी पक्षश्रेष्ठी करत आहेत. या माजी आमदारांपैकी बहुतांश नेते उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजते.

गेल्या निवडणुकीत भाजपचे सात व शिवसेनेचे सहा आमदार, तर राष्टÑवादीचे चार आणि अपक्ष आमदार गणपत गायकवाड विजयी झाले होते. त्यापैकी भाजपचे दोन विद्यमान तर पाच प्रथमच, शिवसेनेच्या चार विद्यमानसह दोन नव्याने आणि राष्टÑवादीच्या दोन विद्यमानसह दोन आमदार नव्याने विजयी झाले होते. गणेश नाईक यांचा बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी एक हजार ४९१ मतांनी पराभव केला होता. भिवंडी ग्रामीण मतदारसंघाची भाजपची जागा शिवसेनेने, तर ठाण्याची शिवसेनेची जागा भाजपचे संजय केळकर यांनी आपल्याकडे खेचली.

गेल्या निवडणुकीत सेनेचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा पराभूत होऊन राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा निवडून आले होते. आता बरोरा सेनेत दाखल झाल्यामुळे सेनेत बंडखोरी होण्याचे चिन्हे आहेत. या मतदारसंघात राष्टÑवादीचे मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे राष्टÑवादी उमेदवाराची चाचपणी करत आहे. भिवंडी (प.) चे समाजवादीचे अब्दुल रशीद ताहीर मोमीन, कल्याण (प) मधील प्रकाश भोईर, उल्हासनगरमधील भाजपचे कुमार आयलानी, कल्याण ग्रामीण मनसेचे रमेश पाटील पराभूत झालेले आहेत.

मीरा-भार्इंदरमधील राष्टÑवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा पराभूत झाले होते. भिवंडी ग्रामीण येथून निवडणूक लढविण्याऐवजी सुरक्षेच्या दृष्टीने भाजपचे विद्यमान आमदार विष्णू सवरा यांनी विक्रमगडमधून निवडणूक लढवली. ते येथे विजयी झाले. पण, यामुळे भिवंडी ग्रामीणची जागा भाजपने गमावली होती. चार जागांऐवजी भाजपने तीन जागा जास्त प्राप्त करून सात जागांवर विजय मिळवला होता.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत २४ पैकी सर्वाधिक पाच जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. भिवंडी (पूर्व) मध्ये अबू आझमी विजयी झाले होते. त्याचवेळी ते मानखुर्द येथूनही निवडून आले होते. त्यांनी भिवंडी पूर्वच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. यामुळे या जागेसाठी पुन्हा निवडणूक झाली असता, सेनेचे रूपेश म्हात्रे निवडून आल्यामुळे सेनेच्या जिल्ह्यातील आमदारांची संख्या सहा झाली होती.

याशिवाय एनसीपी, भाजपच्या प्रत्येकी चार आमदारांसह सीपीएम, मनसे, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष यांचे प्रत्येकी दोन आमदार २००९ मध्ये विजयी झाले होते. काँगे्रसचे उमेदवार राजेंद्र गावित पालघरमधून निवडून आले होते. गेल्या निवडणुकीला पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांतून काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी राहील, हा चर्चेचा विषय आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 Nine legislators ready for defeat this time!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.