Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:21 AM2019-10-02T01:21:10+5:302019-10-02T01:21:32+5:30

मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आणि त्यासाठी सोसायटीबाहेर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत.

Maharashtra Vidhan sabha 2019: no registration, no vote in Ambarnath! | Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट!

Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट!

googlenewsNext

अंबरनाथ : मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आणि त्यासाठी सोसायटीबाहेर फलक लावण्याचे प्रकार वाढले आहेत. निवडणुकीचा रंग चढत असताना बॅनरबाजीचीही रंगत वाढत आहे. अंबरनाथमधील मोहन पुरम सोसायटीच्या ज्या जागेवर इमारती उभारल्या, त्या जागेवर वनविभागाची नोंद आल्याने त्यांच्या फ्लॅटची नोंदणी बंद झाली आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्याने सोसायटीने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
कानसई येथील काही भागांवर वनविभागाच्या नोंदी आल्या होत्या. त्यातील बहुतांश सर्वेक्षण क्र मांक हे शेती या व्याख्येत मोडत होते. मात्र तरीही त्यांच्यावर वनविभागाचा शिक्का बसल्याने नोंदणी करण्यात अडथळे येत होते. २००८ सालापासून वनविभागाच्या या शिक्क्यामुळे नोंदणी, हस्तांतरण, खरेदी आणि विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत येथील मोहन पुरम सोसायटीच्या रहिवाशांनी आक्र मक भूमिका घेतली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मोहन पुरम मित्रमंडळाच्या सदस्यांनी मंडपाबाहेर नोंदणी नाही, तर मतदान नाही, अशा आशयाचे फलक लावले आहे. अकरा वर्षांत नोंदणीचा प्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींवरचा विश्वास उडाला असल्याची प्रतिक्रि या मंडळाचे अध्यक्ष राजेश नाडकर यांनी व्यक्त केली आहे. या सोसायटीत जवळपास साडेचारशे सदनिका असून, जवळपास ७०० मतदार आहेत. त्यांच्या भावना या माध्यमातून व्यक्त केल्याचे नाडकर यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019: no registration, no vote in Ambarnath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.