Vidhan sabha 2019 : प्रताप सरनाईकांची उमेदवारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:48 AM2019-10-02T01:48:01+5:302019-10-02T01:48:44+5:30

ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.

Maharashtra Vidhan sabha 2019: Pratap Sarnaik's nomination is filed | Vidhan sabha 2019 : प्रताप सरनाईकांची उमेदवारी दाखल

Vidhan sabha 2019 : प्रताप सरनाईकांची उमेदवारी दाखल

Next

ठाणे : ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी कार्यक र्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे त्या परिसरात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

युतीची घोषणा झाल्यानंतर ठाणे लोकसभेतील सर्वात मोठा आणि दोन महापालिकांचे कार्यक्षेत्र असलेल्या या मतदारसंघातून सरनाईकांनी उमेदवारी अर्ज भरला. तो दाखल करण्यासाठी शास्त्रीनगरनाक्यापासून बेथनी हॉस्पीटलच्या बाजूला असलेल्या या मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयापर्यंत रॅली काढली होती. यावेळी सरनाईकांसह पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रणजित पाटील, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक, आमदार नरेंद्र मेहता आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या रॅलीमुळे त्याच परिसरातून येजा करणारी वाहने अडकून पडली होती.

सरनाईकांनी २००९ मध्ये या मतदारसंघाचा गड राखला होता. तर २०१४ मध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्टÑवादीने स्वतंत्र निवडणूक लढवली होती. तेंव्हा भाजपाचे संजय पांडे आणि सरनाईकांमधील चुरशीच्या लढतीत ते विजयी झाले होते. यंदा या मतदारसंघातून सेनेतील अनेक दिग्गजांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण पक्षाने सरनाईकांना उमेदवारी देऊन त्यांचे आव्हान थोपवले.

ठाणे आणि मीरा-भार्इंदर या महापालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत कामे केली आहेत.भविष्यात हा मतदारसंघ आणखी मोठा होणार असून जेवढी कामे अजून करता येतील तेवढी करण्याचा प्रयत्न राहिल. चांगला विरोधक मिळाला तर यंदाही लढत रंगतदार होईल. मात्र, युतीचे या मतदार संघात प्राबल्य असल्याने हा विजय निश्चित असून विजय किती मताधिक्याने होतो हेच पाहावे लागणार आहे.
- प्रताप सरनाईक,
उमेदवार, शिवसेना

पाच वर्षांत युती सरकारने भरपूर कामे केली आहेत. हे काम आता उपयोगात येणार असून मतदार मोठ्या संख्येने युतीच्या उमेदवारांना निवडणून देतील, असा मला विश्वास आहे. राज्यात युतीचे वातावरण असून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात युतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. त्याचबरोबर कल्याण पश्चिम मतदारसंघात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो मानणारे शिवसैनिक आहेत. - एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे

सरनाईक यांची निवडणूक हे त्यांची एकट्याची नसून सर्वांची आहे. सरनाईक असे एकमेव कुटुंब आहे जिथे सर्व समस्या सुटतात. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतीलच. त्याचबरोबर महायुतीचे सर्वच उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील.
- रणजित पाटील,
राज्यमंत्री

शांताराम मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

भिवंडी : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार शांताराम मोरे यांना दुसऱ्यांदा शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. पक्षाची यादी जाहीर होताच मंगळवारी मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केला.

यावेळी खासदार कपिल पाटील, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वास थळे, भाजपचे तालुका अध्यक्ष पी. के. म्हात्रे, भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण युवा मोर्चाचे अध्यक्ष श्रीकांत गायकर, जिल्हा परिषद सदस्य कुंदन पाटील, भिवंडी शहापूर संपर्कप्रमुख विष्णू चंदे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून मनसेचे मनोज गुळवी व समाजवादीचे कार्यकर्ते डॉ. नुरु द्दीन अन्सारी यांनी अपक्ष अर्ज दाखल केले. भिवंडी पश्चिम मतदारसंघातून आतापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही.

Web Title: Maharashtra Vidhan sabha 2019: Pratap Sarnaik's nomination is filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.