Vidhan Sabha 2019 : 'पालघरसारखी तडजोड करणार नाही, भाजपसाठीच कार्यरत राहणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:51 AM2019-09-18T00:51:41+5:302019-09-18T00:51:52+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेना दावा करत आहे;

Maharashtra Vidhan Sabha 2019 -Will not compromise like Palghar, will work only for BJP | Vidhan Sabha 2019 : 'पालघरसारखी तडजोड करणार नाही, भाजपसाठीच कार्यरत राहणार'

Vidhan Sabha 2019 : 'पालघरसारखी तडजोड करणार नाही, भाजपसाठीच कार्यरत राहणार'

Next

डोंबिवली : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघावर शिवसेना दावा करत आहे; मात्र हा मतदारसंघ सोडण्यास भाजप तयार नाही. या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये राजेंद्र गावित यांनी केलेली तडजोड करणार नाही. उमेदवारीसंदर्भात पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे स्पष्ट करत कायम भाजपसाठीच काम करत राहणार असल्याचे कल्याण पश्चिमचे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले.
कल्याण प्रेस क्लबतर्फे सोमवारी घेण्यात आलेल्या वार्तालापामध्ये आ. पवार बोलत होते. आ. पवार म्हणाले की, कल्याणच्या विकासकामांसाठी २३३ कोटींचा निधी आणल्याचे त्यांनी सांगितले. आमदार म्हणून नव्हे तर जनसेवक म्हणून काम केल्याचे ते म्हणाले. घनकचरासंकलन, विघटन प्रकल्प, ठाणे-भिवंडी मेट्रो प्रकल्पाला मंजुरी, दुर्गाडी किल्ला डागडुजी आणि विकासासाठी प्रयत्न, शहरातील उद्यानांचा विकास, तलाव सुशोभिकरण आणि संवर्धन, बारवी धरणाची उंची वाढवण्यासाठी पाठपुरावा, प्रदूषित नद्यांच्या विकासासाठी प्रयत्न, महागणपती श्रीक्षेत्र टिटवाळा मंदिराचा विकास, खाडीकिनारा जेट्टी, कल्याण शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश, रस्तेविकास, गोविंदवाडी बायपास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक केंद्र उभारणी, ज्येष्ठ नागरिक भवन व जिम, अल्पसंख्याक विकास, दलितवस्ती सुधार योजना, आमदार दत्तक गाव योजना, क्रीडाभवन, वाहतूककोंडी सोडवण्यासाठी, रस्ते पूल विकासासाठी प्रयत्न, रोजगार मेळावे, पूरग्रस्तांसाठी मदत आदी कामे केल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस, कल्याण पश्चिम मतदारसंघाचे विस्तारक शशिकांत कांबळे, अमित धाक्रस उपस्थित होते. प्रेस क्लबचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 -Will not compromise like Palghar, will work only for BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.