महाराष्ट्र निवडणूक निकाल : एकनाथ शिंदेंनी साधली विजयाची हॅटट्रिक, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघावर फडकविला भगवा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 04:05 PM2019-10-24T16:05:13+5:302019-10-24T16:07:46+5:30
Maharashtra Vidhan Sabha Result : कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे.
ठाणे - कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघावर पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्या विजयाची मोहोर उमटवली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिल्या फेरीपासूनच मतांमध्ये आघाडी घेत आपला गड कायम राखला आहे. शिंदे यांनी 1 लाख 13 हजार 4 मते मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच एकतर्फी निकाल लागल्यामुळे पुन्हा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघावर भगवा फडकविला आहे. या मतदार संघात काँग्रेसचे संजय घाडीगावकर आणि मनसेचे महेश कदम यानी शिंदे यांना आव्हान दिले होते. हे त्यात घाडीगावकर यांनी प्रचारात क्लस्टरचा मुद्दा घेऊन शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अपयशी ठरल्याचे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकाल : 'या' दिग्गजांचा विजय; धनंजय मुंडेंसह आशिष शेलार विधानसभेच्या परीक्षेत पासhttps://t.co/ogkGhNK1eS#MaharashtraAssemblyElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) October 24, 2019
ओवळा माजीवडा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रताप सरनाईक यांना 1,17, 289 मतदारांनी मतांच्या रुपात मतदान केले. त्यांनी काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा 83,772 मतांनी पराभव करत, विजयाची हॅटट्रिक साधली. सुरुवातीपासूनच सरनाईकांनी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत, त्यांनी आपला गड राखला. या विजेयाचे श्रेय त्यांनी मतदारसंघातील शिवसैनिकांना दिले.
विधानसभा मतदारसंघ, निकाल 2019 लाईव्ह : कसब्यातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी https://t.co/cAKQjFAmWZ#VidhansabhaElections2019#VidhanSabhaResults#maharashtra
— Lokmat (@MiLOKMAT) October 24, 2019
विधानसभा निवडणुकाचा कल जवळपास हाती आलेला आहे. भाजपाच्या चौफेर उधळलेल्या वारूला जनतेनं लगाम घातला असून, त्यांची घोडदौड 100 जागांच्या आसपास थांबण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना आणि भाजपामध्ये अनेक नेत्यांची मेगा भरती सुरू होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते आणि उमेदवार सेना-भाजपानं फोडून स्वतःच्या पक्षात घेतले होते. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सेना-भाजपानं आयात केलेल्या एकूण 35 आयारामांपैकी 19 जणांचा पराभव झालेला आहे. त्यातील शिवसेनेचे 11 आणि भाजपाच्या 8 आयाराम उमेदवारांचा समावेश आहे. या निकालानंतर शरद पवारांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाची अब की बार 220 पार ही घोषणा जनतेला पटली नाही. सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. पक्षांतराला जनतेनं पाठिंबा दिलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.