महाराष्टÑ सदनाच्या ठेकेदाराला सरकारचा छदामही मिळाला नाही: चांगली वास्तू उभारुनही झाली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:01 PM2018-12-16T18:01:24+5:302018-12-16T18:16:32+5:30

‘महाराष्टÑ सदना’सारखी सुंदर वास्तू उभारण्यात आली. ते उभारणाऱ्या ठेकेदाराला ८०० कोटींपैकी एक छदामही सरकारकडून मिळाला नाही. मग यात भ्रष्टाचार झाला कसा? आपल्याला का अटक झाली हे माहीत नाही? ज्यांनी अटक केली त्यांनाही ते माहीत नाही? अशी खंत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री छगन भुजबळ यांनी ठाण्यातील कार्यक्रमात व्यक्त केली.

Maharashtra's Sadan's contractor did not get any government funding: Good foundation built though I were arrested | महाराष्टÑ सदनाच्या ठेकेदाराला सरकारचा छदामही मिळाला नाही: चांगली वास्तू उभारुनही झाली अटक

छगन भुजबळ यांची ठाण्यात खंत

Next
ठळक मुद्देछगन भुजबळ यांची ठाण्यात खंतअखिल भारतीय माळी समाजाचे ठाण्यात संमेलनदेशभरातील मान्यवरांची उपस्थिती

ठाणे: दिल्लीमध्ये ‘महाराष्टÑ सदना’सारखी सुंदर वास्तू उभारण्यात आली. ते उभारणा-या ठेकेदाराला ८०० कोटींपैकी एक छदामही सरकारकडून मिळाला नाही. मग यात भ्रष्टाचार झाला कसा? जर पैसेच मिळाले नाही तर तो कोणालाही कसले पैसे देईल, असा सवाल करीत आपल्याला का अटक झाली हे माहीत नाही? ज्यांनी अटक केली त्यांनाही ते माहीत नाही? अशी खंत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि माळी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केली.
अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने ठाण्यात माळी समाजाचे देशभरातील बांधवांसाठी राज्यस्तरीय संमेलन तथा अखिल भारतीय माळी समाजाचे अध्यक्ष डी. के. माळी यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळयाचे रविवारी गडकरी रंगायतन येथे आयोजन करण्यात आले होते. याचवेळी डीत्यावेळी त्यांनी समाजाला एकसंघ राहण्याची हाकही दिली. दिल्लीतील महाराष्टÑ सदनाचा ठेका १०० कोटींहून २५ हजार कोटी झाल्याचे बोलले जाते. मग ते दहा हजार कोटींचे झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात ८०० कोटींचे काम असूनही ठेकेदाराने ते १०० कोटींमध्ये पूर्ण केले. मग यात ८५० कोटी रुपये ठेकेदाराने एखाद्या मंत्र्याला देण्याचा प्रश्नच येतो कुठे? जर सरकारकडून ठेकेदाराला एक छदामही न देता त्याचा गेली पाच ते सहा वर्ष अगदी फुकट वापरही होतो आहे. तरीही भ्रष्ट्राचाराचा आरोप करीत आपल्याला नाहक अटक करण्यात आली. खरेतर कोणाला अडकवायचे हे ठरविले जाते, त्यानुसारच यात आपल्याला अडकविण्यात आल्याचा आरोप भुजबळ यांनी केला. केस झाल्यानंतर यात मग तारीख पे तारीख सुरु आहे. जो चुकीचे काम करेल त्याला शिक्षा नक्की मिळेल. आपण कोणतेही गैरकृत्य केले नसून ज्याने आपल्यावर अन्याय केला त्याचा वरच्या (ईश्वराच्या) न्यायालयात योग्य न्याय होईल.
आपण केवळ माळी म्हणून एकत्र येण्यापेक्षा सर्व इतर मागासवर्गीय समाजाला एकत्र घेऊन राजकारणातही पुढे आले पाहिजे. केवळ दुस-या पक्षात चटया उचलण्याचे काम करुन चालणार नाही, नेतृत्वाचीही फळी उभी केली पाहिजे. अशी साद त्यांनी आपल्या बांधवांना घातली.
फुलेंप्रमाणेच डीकेंचेही कार्य
ज्यावेळी शिक्षण क्षेत्रात मैलाचा दगड म्हणून काम करणा-या महात्मा ज्योजिबा फुले यांची उद्योेजक म्हणूनही मोठी ओळख होती. टाटांच्या उद्योगाची उलाढाला २० हजारांचा असतांना लेखक आणि कवी म्हणून नावारुपाला आलेल्या फुलेंच्या उद्योगाची उलाढाल ही वर्षाला २० लाखांची होती. सोन्याचे शिक्के बनविण्याची त्यांची एजन्सी होती. हे साम्राज्य असतांनाही त्यांनी समाजकार्यात झोकून देऊन अनन्यसाधारण कार्य केले. अगदी त्याचप्रमाणे ठाण्यातील बापू माळी यांचेही समाजासाठी मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. संघर्षमय आयुष्य जगणा-या माळी यांनी केमिकल कंपनीतील नोकरी, बांधकाम क्षेत्रात काम केले.त्यांना अजून २४० पेक्षा अधिक पोर्णिमांचे दर्शनाबरोबर त्यांच्या हातून चांगले समाजकार्य घडण्याचे त्यांनी अभिष्टचिंतन केले.
यावेळी उत्तरप्रदेशचे कॅबिनेट मंत्री स्वामीप्रसाद मौर्य, सैनी माळी सेवा समितीचे दिलबाग सैनी, उद्योगपती शंकर बोरकर, नेपाळचे माजी मंत्री शत्रुघ्न सिन्हा, तेलंगणाचे शिवकुमार पेटकुले, माळी समाज ठाणे शहर अध्यक्ष सचिन शिंदे आणि डॉ. राम माळी आदींनीही समाजाला उद्बोधन करीत एकसंघ होण्याचे आवाहन केले. तसेच.डीके यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता लोंढे यांनी केले.

Web Title: Maharashtra's Sadan's contractor did not get any government funding: Good foundation built though I were arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.