वीजसमस्या सोडवण्यासाठी महावितरणला मिळणार निधी- डॉ. शिंदे यांचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 02:06 AM2020-01-08T02:06:31+5:302020-01-08T02:06:34+5:30

पूर्वेतील राजेंद्र प्रसाद रोड, चार रस्ता, रघुवीर नगर, कस्तुरी प्लाझा, रामनगर, मनोरमा सोसायटी, चंद्रमा सोसायटी या परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता.

Mahavidyar will get funds to solve electricity problems - Dr Follow Shinde | वीजसमस्या सोडवण्यासाठी महावितरणला मिळणार निधी- डॉ. शिंदे यांचा पाठपुरावा

वीजसमस्या सोडवण्यासाठी महावितरणला मिळणार निधी- डॉ. शिंदे यांचा पाठपुरावा

Next

डोंबिवली : पूर्वेतील राजेंद्र प्रसाद रोड, चार रस्ता, रघुवीर नगर, कस्तुरी प्लाझा, रामनगर, मनोरमा सोसायटी, चंद्रमा सोसायटी या परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. यावेळी विविध कामांसाठी निधी नसल्याचे कारण अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे शिंदे यांनी तातडीने जिल्हा नियोजन विभागाकडून निधी दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
रघुवीरनगर आणि रामनगरच्या काही भागांतील वीजसमस्येमुळे नागरिक हैराण असल्याचे शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी शिंदे यांना कळवले होते. तसेच कामेही कुर्मगतीने होत असून, त्यात महावितरणकडून दिरंगाई होत असल्याची तक्रार मोरे यांनी केली होती. शिंदे यांनी त्याची दखल घेत मंगळवारी महावितरणच्या अधिकाºयांसमवेत आढावा बैठक घेतली. यावेळी निधी देण्यासंदर्भात चर्चा झाली. निधी वेळेत मिळाल्यास महावितरणची बहुतांशी कामे पुढील महिन्याच्या आत पूर्ण होईल, असे आश्वासन महावितरणच्या अधिकाºयांनी शिंदे यांना दिले.
या बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, महावितरणतर्फे विभागीय संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंता सुनील काकडे, धर्मराज शिंदे, शैलेंद्र राठोड, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.
शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना इत्यादी योजनेतून १२० कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांची पूर्तता कशी व कधी होणार आहे, अशी विचारणा शिंदे यांनी अधिकाºयांना केली. त्यावर या कामांसाठी रस्ता खोदून पूर्ववत करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी केडीएमसीकडे अर्ज केला आहे. परवानगी मिळताच ही कामे सुरू करून जूनपर्यंत पूर्ण केली जातील, असे सांगितले. शिंदे यांनी केडीएमसी आयुक्त गोविंद बोडकेंना कामासाठी मंजुरी द्यावी, अशा सूचना दिल्या.
>कल्याण पूर्व, अंबरनाथमध्ये होणार कामे
कल्याण पूर्वेतील मेट्रो मॉल व अंबरनाथ पश्चिमेतील मोहनपूरमजवळ नवीन उपकेंद्र, २७९ नवीन ट्रान्सफॉर्मर, २२२ जुन्या ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे १५६ किमी लांबीची उच्च दाबाची व लघु दाबाची वाहिनी टाकणे, झंपर बदलणे, आदी तांत्रिक काम करण्यात येणार आहेत.

Web Title: Mahavidyar will get funds to solve electricity problems - Dr Follow Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.