भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 17:06 IST2023-04-04T17:05:42+5:302023-04-04T17:06:07+5:30
सामाजिक सदभाव,अहिंसा, पर्यावरण संवर्धन,शाकाहार याबाबत जनजागृती करणारे विविध देखावे या शोभायात्रेत सहभागी करण्यात आले होते.

भिवंडीत महावीर जयंती उत्साहात साजरी
भिवंडी :दि.४-जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान महावीर यांची जयंती भिवंडी शहरात मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने समस्त जैन महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या शोभायात्रेत हजारोच्या संख्येने स्त्री पुरुष आबालवृद्ध लहान बालके मोठ्या भक्ती पूर्ण वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झाले होते. सामाजिक सदभाव,अहिंसा, पर्यावरण संवर्धन,शाकाहार याबाबत जनजागृती करणारे विविध देखावे या शोभायात्रेत सहभागी करण्यात आले होते.
आदर्श पार्क गोकुळ नगर येथून सुरू झालेली शोभायात्रा मंडई,गौरीपाडा, कणेरी,धामणकर नाका,कल्याण नाका,अशोक नगर या ठिकाणी शोभयात्रेचा समारोप करण्यात आला.तब्बल पाच किलोमीटरहून अधिक अंतर असलेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी विविध मान्यवरांकडून स्वागत करण्यात आले.यावेळी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली होती.