अवैध दारूविरुद्धच्या कारवाईने महेश पाटील यांची ठाण्यातील कारकीर्द गाजली

By जितेंद्र कालेकर | Published: August 1, 2018 10:54 PM2018-08-01T22:54:12+5:302018-08-01T23:03:36+5:30

ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची गेल्या दोन वर्षांतील कारकीर्द चांगलीच गाजली. अवैध दारुविरुद्ध सुरु केलेली व्यापक मोहीम, भाजपाचे नगरसेवक यांच्याविरुद्ध खंडणीच्या गुन्हयातील कारवाई, शिवसेना पदाधिकाऱ्याच्या खूनाचा छ डा अशा अनेकविध कारणांनी त्यांनी आपला ग्रामीण अधीक्षकपदी ठसा उमटविला.

 Mahesh Patil's career took place in Thane with illegal action against him | अवैध दारूविरुद्धच्या कारवाईने महेश पाटील यांची ठाण्यातील कारकीर्द गाजली

गुन्हेगारीस बसला चाप

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीण अधीक्षकपदी उमटला ठसागुन्हेगारीस बसला चापपारदर्शक गतिमान पोलीस सेवेसाठी आॅनलाइन तक्रार सुविधा

जितेंद्र कालेकर
ठाणे : अवैध दारूविरुद्ध संपूर्ण ठाणे ग्रामीण भागात पोलिसांनी सुरू केलेली कारवाईची मोहीम, या व्यवसायातील अनेकांचे केलेले पुनर्वसन, मीरा रोड भागात अनेक कुख्यात सोनसाखळी चोरट्यांवर केलेली कारवाई आणि दहशत माजवणाºयांवर मोक्कांतर्गत कारवाई केल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांची कारकीर्द चांगलीच गाजली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पाटील यांची बदली झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कारकिर्दीबद्दल समाधान व्यक्त केले.
पाटील यांनी १६ मे २०१६ रोजी ठाणे ग्रामीणच्या अधीक्षकपदाची सूत्रे घेतली होती. गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच त्यांनी अवैध गावठी दारूविरुद्ध व्यापक मोहीम उघडली. यामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये मीरा रोड, भार्इंदर, गणेशपुरी, शहापूर आणि मुरबाड या उपविभागांतील १७ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात दोन हजार ७३९ अवैध मद्यविक्रेत्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक कोटी ७६ लाख सहा हजार ४१६ रुपयांचा माल जप्त केला. अनेक दारूविक्रेत्यांना अन्य व्यवसाय स्थापन करण्यास मदत करून त्यांचे पुनर्वसनही केले. पोलिसांच्या या व्यापक मोहिमेमुळे जिल्ह्यातील सुमारे ३७१ ग्रामपंचायतींनी गावात गावठी दारू बंद झाल्याचा ठरावही केला. अशा अवैध दारूविक्रीवर पोलिसांच्या मदतीसाठी ३९४ ग्रामरक्षकांचीही निर्मिती केली.
* आठ हजार नागरिकांचा मुद्देमाल केला परत
चोरी तसेच दरोड्यातील मुद्देमाल हस्तांतरणासाठीही त्यांनी विशेष पुढाकार घेतला. सुमारे आठ हजार नागरिकांचा मुद्देमाल परत करण्यात पोलिसांना यश आले. पारदर्शक गतिमान पोलीससेवेसाठी आॅनलाइन तक्रार सुविधा तसेच अर्ज चौकशीमध्येही गती आणली. प्रलंबित अर्जांचे प्रमाण १० हजारांवरून दीड हजारापर्यंत आणले. पासपोर्टच्या पडताळणीमध्येही सुसूत्रता आणल्यामुळे नागरिक पोलीस ठाण्यात येण्याऐवजी पोलीस नागरिकांच्या घरी जाऊन टॅबच्या मदतीने पडताळणी करतात. अमली पदार्थविरोधी मोहीमही व्यापकपणे राबवून तरुणतरुणींमध्ये पोलिसांनी जनजागृती केली.
गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण तीन टक्कयांनी वाढले
चोरी, दरोडे, फसवणूक, लैंगिक अत्याचार असे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ६९ वरून ७२ टक्के आणले. नगरसेवक महेश पाटील खंडणी प्रकरण, व्यापा-याला खंडणीसाठी ओलीस ठेवणारा दीपक वैरागड या पोलीस कर्मचा-यासह दोघांची अटक, शहापुरातील शिवसैनिकाच्या हत्येचा उलगडा आणि अंबरनाथ येथे तरुणावर गोळीबार करून त्याच्या प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक हे महत्त्वाचे गुन्हे आपल्या कार्यकाळात उघड करण्यात यश आल्याचे पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

* पोलीस कर्मचा-यांसाठी गृहसंकुल योजना
मीरा-भार्इंदर महापालिका आणि ठाणे जिल्हा परिषद या दोन महत्त्वाच्या निवडणुकाही शांततेत पार पडल्या. याशिवाय, समृद्धी महामार्गाच्या सर्वेक्षणाला विरोध असतानाही ती मोजणीप्रक्रिया यशस्वीपणे हाताळली. या दोन वर्षांच्या काळात पोलीस कर्मचा-यांसाठीही टिटवाळ्यात गृहसंकुलाची योजना कार्यान्वित केली. नागरिकांना आपल्या कामातून न्याय देऊ शकलो, याचे समाधान असल्याचे ते म्हणाले.
 

Web Title:  Mahesh Patil's career took place in Thane with illegal action against him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.