"मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे ज्यांना मानसिक धक्का बसेल अशासाठी मनोरुग्णालयात बेड राखून ठेवा"
By अजित मांडके | Published: October 7, 2022 07:22 PM2022-10-07T19:22:48+5:302022-10-07T19:23:06+5:30
शिंदे गटाच्या महिला आघाडीने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन केले आहे.
ठाणे : उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातू रुद्रांशवर केलेल्या टीकेचा अनेक राजकीय नेते निषेध व्यक्त करत असतानाच ठाण्यातील शिंदे गटाच्या महिला आघाडीने त्यांचा निषेध भलत्याच पद्धतीने नोंदवला आहे. ठाण्यातील शिंदे गटाच्या महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी आणि त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाण्याच्या मनोरुग्णालयात जाऊन दोन बेड आरक्षित केले आहेत.
यापैकी एक बेड थेट उद्धव ठाकरे यांच्यासाठी राखीव असल्याचे मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले आहे. दीड वर्षाच्या बाळावर ज्यांनी टीका केली त्यांची मानसिक स्थिती नक्कीच चांगली नसणार आणि ती चांगली व्हावी यासाठीच मनोरुग्णालयात हा बेड आरक्षित करत असल्याचे त्या म्हणाल्या आहेत, तर दुसरा बेड देखील मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे ज्यांना मानसिक धक्का बसेल अशासाठी राखून ठेवावा असे निवेदन या महिला आघाडीने मनोरुग्णालयाच्या प्रशासनाला दिले आहे.