प्रसूती वॉर्ड झाले गोडाउन; दुुरुस्तीचा अद्यापही पत्ताच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 12:07 AM2018-08-23T00:07:18+5:302018-08-23T00:07:40+5:30
रुग्णांत संताप, दुरूस्ती झाल्यास आणखी १९ खाटा वाढणार
ठाणे : शासकीय रुग्णालयातील ऐतिहासिक असलेल्या इमारती जीर्ण होण्यास सुरुवात झाल्याने त्या इमारतीचे प्लास्टर बऱ्याच ठिकाणी निखळताना दिसत आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील १९ खाटा असलेल्या प्रसूती विभागातील काही ठिकाणी प्लास्टर पडल्याने तो विभाग दुरुस्तीचे कारण देऊन खाली करून तो अन्य विभागांमध्ये स्थलांतरित केला. मात्र, दुरुस्तीच्या नावाखाली रिकामा केलेल्या त्या विभागात दुरुस्तीचा अद्यापही पत्ता नसल्याने तेथे सध्या औषधांचे बॉक्स ठेवले असून त्याला आता गोडाउनचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जर हा विभाग दुरुस्त करून दिला, तर आणखी १९ खाटा वाढतील तसेच गादीवर झोपावे लागणाºयांपैकी काही मातांना खाटा उपलब्ध होतील. त्यामुळे तो विभाग लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी दबक्या आवाजात कर्मचाºयांकडूनच होऊ लागली आहे. आधीच या विभागात अपुºया खाटांमुळे माता व नवजात अर्भकांना जमिनीवर झोपवण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे.
अपुºया जागेत स्वच्छता कशी ठेवायची?
जिल्ह्याचे रुग्णालय म्हणून या रुग्णालयात ठाणे जिल्ह्यासह पालघर या जिल्ह्यातील ग्रामीण भागातून रुग्ण उपचारार्थ येथे येतात. त्यामध्ये ताप असो, विंचू किंवा सर्पदंश असो तसेच प्रसूती असो, यासाठी गोरगरीब रुग्णांची येथे नेहमीच गर्दी पाहण्यास मिळते. त्यातच, या रुग्णालयाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. हे रुग्णालय सुपरस्पेशालिटी करायचे असल्याने तेथे तूर्तास स्थलांतरित करण्याचे प्रयत्न जोमाने सुरू आहे. मात्र, त्याला काही यश येताना दिसत नाही. त्यातच, रुग्णालयातील विविध विभागांत प्लास्टर पडणे, सज्जा तुटणे, असे प्रकार काही दिवसांपासून घडत आहेत.
त्याचप्रमाणे प्रसूती वॉर्डमध्ये काही ठिकाणी प्लास्टर पडले. या विभागामध्ये नवजात बालक आणि गरोदर माता असल्याने तो विभाग दुरुस्त केला आणि नीटनेटक्या असलेल्या १४ खाटांच्या विभागात स्थलांतरित केला. पण,या विभागात प्रसूतीनंतर साहित्य धुण्यासाठी पुरेशी जागा नसल्याची बोंब येथील कर्मचारी करत आहेत. त्या अपुºया जागेत साहित्य स्वच्छ करावे लागत आहे. त्यातच, दुरुस्तीच्या नावाखाली प्रसूती वॉर्डला गोडाउनचे स्वरूप दिल्याने रुग्णांच्या नातेवाइकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
त्या विभागाचे गोडाउन केलेले नाही. पावसाळा असल्याने तेथे औषधे ठेवली आहेत. लवकरच त्या विभागाची दुरुस्ती करून तेथे लेबर वॉर्ड सुरू करण्यात येईल. - डॉ. अशोक कांबळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक,
जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे