दैव बलवत्तर म्हणून! पुढे धडधडत मेल एक्स्प्रेस गेली, मागून लोकल आली; पावसाळ्यापासून त्याचठिकाणी तीनदा खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 10:59 AM2023-03-09T10:59:19+5:302023-03-09T10:59:51+5:30

रेल्वे चे अधिकारी ,कर्मचारी 2 किलोमीटर ची पायपीट करीत घटनास्थळ दाखल झाले व दुरुस्ती चे काम सुरु केले .

mail express went in full speed, followed by the local; Pits thrice at the same place since monsoon kasara railway track | दैव बलवत्तर म्हणून! पुढे धडधडत मेल एक्स्प्रेस गेली, मागून लोकल आली; पावसाळ्यापासून त्याचठिकाणी तीनदा खड्डे

दैव बलवत्तर म्हणून! पुढे धडधडत मेल एक्स्प्रेस गेली, मागून लोकल आली; पावसाळ्यापासून त्याचठिकाणी तीनदा खड्डे

googlenewsNext

- शाम धुमाळ

कसारा : कसारा कल्याण रेल्वे मार्गांवरील कसारा उबरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान  रेल्वे रुळा खालील खडी चा भरावं खचून खड्डा पडल्याने आज सकाळी 6,20 पासून  कसारा कल्याण रेल्वे मार्गांवरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. दरम्यान दैव बलवत्तर म्हणून रेल्वे चा मोठा अनर्थ टळला.

आज सकाळी 6 वाजे च्या दरम्यान कसारा उबरमाळी रेल्वे स्थानका दरम्यान कल्याण कडे जाणाऱ्या वाहिनी वरील  रेल्वे रुळा खालील खडी अचानक दबली गेली व अचानक मोठा खड्डा त्या ठिकाणी तयार झाला होता. याचं दरम्यान एक मेल एक्सप्रेस भरधव वेगात कल्याण दिशे कडे रवाना झाली. त्यामुळे रेल्वे रुळा खालील खडी जास्त प्रमाणात खचून त्या ठिकाणी मोठा खड्डा तयार झाला. ही बाब मेल एक्सप्रेसच्या मागून येणाऱ्या कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल च्या मोटरमन व काही प्रवाशाच्या  लक्षात आली. लोकलच्या मोटरमन ने लोकल  हळूहळू उबरमाळीच्या दिशेने नेली व रेल्वे रुळा खालील घटनेबाबतची माहिती उबरमाळी, कसारा ,रेल्वे स्टेशन मास्तर ,.व रेल्वे च्या नियंत्रण कक्षाला दिली .

 त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेत कसारा कल्याण रेल्वे मार्गांवरील वाहतूक काही काळ रोखून धरली .घटनेची माहिती उपलब्ध होताच  रेल्वे चे अधिकारी ,कर्मचारी 2 किलोमीटर ची पायपीट करीत घटनास्थळ दाखल झाले व दुरुस्ती चे काम सुरु केले .पडलेल्या भगदाड (खड्डा) च्या ठिकाणी तात्काळ दगडी टाकून त्यावर खडी भरलेल्या गोण्या टाकून भराव तयार केला भरावं  करून रेल्वे ट्रॅक ला  तात्पुरता मजबूती देऊन धिम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरु केली..दरम्यान या मुळे आज सकाळी एक कसारा मुबई सी.एस.टी लोकल रद्द करण्यात आली  .परिणामी या मुळे चाकरमानी प्रवाशांसह शालेय विध्यार्थी,परीक्षार्थी  यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

कायम स्वरूपी उपाययोजना नाही.
दरम्यान आज ज्या ठिकाणी खडी दबल्याने खड्डा पडला त्या ठिकाणी या अगोदर दोन वेळा पावसाळ्यात असा प्रकार घडला होता  परंतु त्या वेळी सुद्धा तात्पुरता काम केले होते दरम्यान तात्पुरता मलम पट्टी करून वेळ मारून न्यायचे काम करणाऱ्या रेल्वे प्रशासना मुळे एक दिवस मोठा अनर्थ होऊ शकतो.

दैव बलवत्तर म्हणून...
दरम्यान या कमकुवत रेल्वे ट्रॅक वरून भरधाव वेगात गेलेली मेल एक्सप्रेसच्या वेगाने व वजनाने भराव खचलेल्या ठिकाणचे रेल्वे ट्रॅक तुटले असते तर मोठा अनर्थ घडला असता.

कल्याण कसारा रेल्वे वाहतूक सेवा नियमित कोमात.
दरम्यान कल्याण कसारा रेल्वे मार्गांवरील रेल्वे वाहतूक कायम या ना त्या कारणाने विस्कलीत असते त्यामुळे या मार्गावर रोज प्रवास करणारे चाकरमानी प्रवासी पुरते वैतागले असून प्रवशाच्या समस्या सोडविण्यासाठी  कार्यरत असलेल्या प्रवासी संघटना या कुचकामी ठरत आहे.

Web Title: mail express went in full speed, followed by the local; Pits thrice at the same place since monsoon kasara railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.