ठाण्याची मुख्य स्मशानभूमी वैकुंठधाम होणार स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:53 AM2017-08-11T05:53:24+5:302017-08-11T05:53:28+5:30

मागील कित्येक वर्षे जुन्या ठाण्याची साक्ष देणाºया ठाण्याची मुख्य स्मशानभूमी (वैकुंठधाम) अनेक वर्षांनंतर कायापालट होणार आहे. ८ पिढ्यांचे साक्षीदार असलेली ही स्मशानभूमी आता एकविसाव्या शतकातले नव्या ठाण्याचे देशातील प्रथम क्र मांकाचे अत्याधुनिक आणि तेवढेच स्मार्ट वैकुंठधाम बनत आहे.

 The main crematorium of Thane, Vaikundhdham will be smart | ठाण्याची मुख्य स्मशानभूमी वैकुंठधाम होणार स्मार्ट

ठाण्याची मुख्य स्मशानभूमी वैकुंठधाम होणार स्मार्ट

Next

अजित मांडके 
ठाणे : मागील कित्येक वर्षे जुन्या ठाण्याची साक्ष देणाºया ठाण्याची मुख्य स्मशानभूमी (वैकुंठधाम) अनेक वर्षांनंतर कायापालट होणार आहे. पोर्तुगीज ते पेशवाई आणि ब्रिटिश ते स्वातंत्र्योत्तर काळ अशा ८ पिढ्यांचे साक्षीदार असलेली ही स्मशानभूमी आता एकविसाव्या शतकातले नव्या ठाण्याचे देशातील प्रथम क्र मांकाचे अत्याधुनिक आणि तेवढेच स्मार्ट वैकुंठधाम बनत आहे.
इंद्रधनुष्य (सहीयारा) ही सेवाभावी संस्था हा प्रकल्प स्वखर्चाने वर्षभरात पूर्ण करणार असून त्यासाठी वैकुंठधाम बंद राहणार नसल्याचेही सांगण्यात आले. यासाठी ५ कोटींचा खर्च केला जाणार असून यासाठी ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले आहे.
ठाण्याची लोकसंख्या ५ हजारांहून २५ लाखांपर्यंत पोहोचली असताना ठाण्याची मुख्य स्मशानभूमी म्हणून या वैकुंठधामाला महत्त्व आहे. गेल्या १०० वर्षांत सुमारे डझनभर जीर्णोद्धार आणि नूतनीकरण झाले. विद्युतदाहिनीचा पहिला प्रयोगदेखील १५ वर्षांपूर्वी याच स्मशानात झाला होता.
सध्याच्या फायर ब्रिगेड इमारतीपासून वखारीपर्यंत वेगवेगळ्या ६ भागांमध्ये या प्रकल्पाचा आराखडा बनला असून सुमारे ३ हजार चौमी क्षेत्रफळात हे नवीन स्मशान उभे राहणार आहे. अर्थात, आताच्या स्मशानभूमीपेक्षा हे क्षेत्र ४ पट मोठे आहे. त्यासाठी सर्वात जुन्या फायर ब्रिगेडची शेड, त्या पाठीमागचे जुने गोदाम, मंदिर, अडगळीतले रस्त्यावरचे शौचालय, प्रवेशद्वारासमोरची काही निवासी बांधकामे हटवली जाणार आहेत. या संपादनाचा गुंता प्रचंड मोठा होता. तो आयुक्त जयस्वाल यांनी सलग दोन वर्षे पाठपुरावा करून मार्गी लावला आहे. या प्रोजेक्टमध्ये येणाºया ५० वर्षांचा विचार केला आहे.

मुलांचे स्मशान : मुलांच्या अंत्यविधीसाठी ठाणे-मुंबईत पुरेशा स्मशानभूमी नाहीत. वैकुंठधाममधील बालस्मशानही फार जुने असून तोकडे आहे. त्यामुळे अगदी तीन फुटांवरच मृतदेहांचे अवशेष बाहेर येतात. याचे भान ठेवून बालस्मशानात मातीचा थर वाढवून येथे मोठी जागा ठेवली आहे.

स्मार्ट मांडणी : ३०० माणसे एकाच वेळी बसू शकतील, असे सभागृह ही या प्रकल्पाची खासियत असणार आहे. लाकूड, गॅस आणि इलेक्ट्रिकल अग्नी देणाºया ६ मशीन शिवाय टॉयलेट, कार्यालय, मंदिर अशा सहा टप्प्यांत या अत्याधुनिक स्मार्ट वैकुंठधामचा नवा चेहरा असल्याचे संस्थेचे अध्यक्ष रसिकभाई शहा (सावली) यांनी सांगितले.

भविष्याचा वेध घेऊन स्मार्ट मशिनरी

हिंदू अग्निक्रिया लक्षात घेऊन प्रमुख ६ मशीन लाकडासह अग्नी देणाºया बनवण्यात आल्या आहेत. एक ट्रॉली लाकडावरचे पार्थिव घेऊन मशीनमध्ये जाईल. क्र ब पद्धतीने धूर, उष्णता, विस्तवाचे कण या सर्व गोष्टी शोषून ते आउटलेट चिमणीद्वारे वातावरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे शेजारच्या वसाहतीला होत असलेला उष्णता, वास, धूर आणि प्रदूषणाचा त्रास थांबेल.

आज १ मृतदेह जाळायला किमान २०० ते २५० किलो लाकूड जाळावे लागते. त्याचे प्रमाण ३० ते ३५ किलोवर येईल व हिंदू रिवाजाप्रमाणे अग्निविधी कायम राहणार आहे.

१५ वर्षांपूर्वी विद्युतदाहिनी बसवतानाही काही कारणाने नाके मुरडली गेली होती. त्याचे भान ठेवून या स्मार्ट मशिनरी भविष्याचा वेध घेऊन बनवण्यात आल्या आहेत. या सर्व मशीनला गॅसमध्ये कन्व्हर्ट केलेले आहे. ज्यांना लाकूड नको, त्यांना हा दुसरा इकोफ्रेण्डली पर्याय पहिल्या दिवसापासून खुला ठेवण्यात आला.

Web Title:  The main crematorium of Thane, Vaikundhdham will be smart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.