राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १४ लाखाहून अधिकचा बनावट विदेशी मद्य व इतर मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 09:06 PM2022-02-09T21:06:42+5:302022-02-09T21:06:48+5:30
- रणजीत इंगळे ठाणे: राज्य उत्पादन शुल्क ठाणे आणि नवी मुंबई विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथील ठाणे बेलापूर रोडवर ...
- रणजीत इंगळे
ठाणे: राज्य उत्पादन शुल्क ठाणे आणि नवी मुंबई विभागाच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई येथील ठाणे बेलापूर रोडवर बनावट विदेशी मद्याच्या वाहतुकीवर पाळत ठेऊन छापा टाकट तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १४ लाख ३५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाला गुप्तमाहितीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडे ५ वाजण्याच्या सुमारास भरारी पथक ठाणे विभाग, विभागीय भारती पथक ठाणे, निरीक्षक पनवेल शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सापळा रचला. त्या दरम्यान त्यांनी एमएच ०२ बीक्यू ८०८३ वाहन अडवले. यावेळी गाडीची तपासणी केली असता, राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्या गाडीत बनावट विदेशी मद्याच्या काही बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. सुनील वाघेला, उमेश दुबे आणि साहिल चौहान अशी ताब्यात घेतलेल्या तीन जणांची नावे आहेत. त्यातील पहिला आरोपी सुनील वाघेला हा धरावी मुंबई येथील रहिवाशी आहे. दुसरा आरोपी उमेश दुबे हा कांदिवली मुंबईचा रहिवाशी आहे तर तिसरा आरोपी साहिल चौहान हा तुर्भेगाव नवी मुंबई येथील रहिवाशी आहे. या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीन ठिकाणी छापा टाकण्यात आला.
या छापेमारी दरम्यान पहिल्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाला १ हजार मिलीलीटरच्या ५ बनावट स्कॉच मद्याच्या सीलबंद बाटल्या, १ हजार मिलीलीटरच्या विविध ब्रँडच्या ५० रिकाम्या बाटल्या व दोन मोबाईल आधाळून आले. दुसऱ्या ठिकाणावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाला विदेशी बनावट १ हजार मिलीलीटरच्या ४८, २ हजार मिलीलीटरच्या २, ७०० मिलीलीटरच्या ३ अशा विविध ब्रँडच्या आणि मिलीलीटरच्या बनवत स्कॉच मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. तसेच १ हजार मिलीलीटरच्या ८५७ रिकाम्या बाटल्या, ८०० विविध ब्रांडचे लेबल, २ ड्रायर, २ टोचे असा मुद्देमाल आढळून आला तर तिसऱ्या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी एक एमएच ४३ एयु २२६३ पांढऱ्या रंगाची दुचाकी, विदेशी मद्याच्या १ हजार मिलीलीटरच्या ४ बाटल्या एक मोबाईल असा मुद्देमाल आढळून आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या तीनही ठिकाणावर केलेल्या छापेमारी दम्यान त्यांनी एक काळ्या पिवळ्या रंगाची एमएच ०२ बीक्यू ८०८३ टॅक्सी व्हॅन, एमएच ४३ एयु २२६३ पांढऱ्या रंगाची एक दुचाकी, ७०० मिलीलीटर, १ हजार मिलीलीटर, २ हजार मिलीलीटरच्या ६२ बनावटी स्कॉच मद्याच्या सीलबंद बाटल्या तसेच १ हजार मिलीलीटरच्या विविध विदेशी ब्रँडच्या हजारो रिकाम्या बाटल्या, ८०० विविध ब्रांडचे लेबर, ३ मोबाईल, २ ड्रायर, २ टोचे असा एकूण १४ लाख ३५ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरचा तपास हा राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभाग अधीक्षक निलेश सांगडे यांच्या असून पुढील तपास सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क ‘ई-१’ ठाणे विभागाचे दुय्यम निरीक्षक संजय राठोड करत आहेत.