विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 06:29 AM2023-04-14T06:29:00+5:302023-04-14T06:29:08+5:30

महाराष्ट्रासह देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

Major mishap at Ambedkar Jayanti procession in Virar; Two died and three were seriously injured due to electric shock | विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

विरारमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना; विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

googlenewsNext

नालासोपारा (मंगेश कराळे) :-

महाराष्ट्रासह देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भीमसैनिकांकडून जल्लोष साजरात केला जातोय. अशातच विरामधून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकी दरम्यान विजेचा धक्का लागून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत. 

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विरारच्या कारगिल नगर परिसरात गुरूवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येलाच ही दुर्देवी घटना घडल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

नेमके काय घडले ?
विरारच्या कारगिल नगर येथील बौध्दजन पंचायत समितीतर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ९ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली. कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते.

त्यावेळी मिरवणूक ट्रॉलीवर ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉड जवळील रोहित्राला लागला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील ६ जण होरपळले. त्यातील रुपेश सुर्वे (३०) आणि सुमित सुत (२३) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण जखमी झाले. उमेश कनोजिया (१८), राहुल जगताप (१८), सत्यनारायण (२३) आणि अस्मित खांबे (३२) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. जखमींपैकी अस्मित खांबे याची प्रकृती स्थिर असून उमेश, राहुल आणि सत्यनारायण यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

तिघांनाही मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मिरवणुकीतून परताना ट्रॉलीवरील लोखंडी रॉडचा ट्रान्सफॉर्मरला धक्का लागल्याने वीजेचा झटका लागून ही दुर्घटना घडल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त रामचंद्र देशमुख यांनी दिली. या दुर्घटनेमुळे शहरावर शोककळा पसरली आहे.

Web Title: Major mishap at Ambedkar Jayanti procession in Virar; Two died and three were seriously injured due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.