दिव्यात पाणीटंचाई! पाण्यासाठी पालिकेने यंत्रणा राबवावी, नागरिकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 12:19 PM2020-03-27T12:19:08+5:302020-03-27T12:20:49+5:30
गेल्या वर्षभर पाणी टंचाई असताना आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संचारबंदी केल्याने अधिक तीव्रतेने पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे.
ठाणे - ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यात आधीच गेल्या वर्षभर पाणी टंचाई असताना आता कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संचारबंदी केल्याने अधिक तीव्रतेने पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यातच अनेक नागरिक घरीच असल्याने टँकरचे विकतचे पाणी घेणे त्यांना शक्य होत नसल्याने ठाणे महापालिकेने दिव्यातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा राबवावी अशी मागणी भाजपचे माजी सरचिटणीस व सेव्ह दिवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
दिव्यात सुमारे 5 ते 6 लाख नागरिक राहत असून ते सरकारच्या नियमांचे पालन करत आहेत. संपूर्ण दिव्यात लॉकडाऊन असताना नागरिकांनी आपल्या इमारती ही लॉकडाऊन केले आहेत. दिव्यात उन्हाळा असो या पावसाळा किंवा हिवाळा नेहमीच पाणी समस्या निर्माण केली जात आहे. तीच समस्या आता आधीच गंभीर आहे. अनेक नागरिक हे पिण्याचे पाणी हजारो रूपये मोजून टँकरद्वारे घेत असतात.त्यामुळे टँकर लॉबी उदयास आली आहे. मात्र आता नागरिक घरीच थांबणार असल्याने त्यांच्या समोर आर्थिक संकट देखील निर्माण झाले आहे. तर पालिकेच्या पाणी पुरवठा बाबत दिव्यात सावळा गोंधळ आहे.
परिणामी दिव्यात नागरिकांना गरजे पुरते पाणी मिळणे आवश्यक असून पालिकेने हा विषय लक्षात घेऊन नागरिकांना प्रत्येक सोसायटी नुसार येते काही दिवस मोफत पाणी पुरवठा करावा.तसेच दिव्यात पालिकेच्या पाणी पुरवठा लाईनला अनेक परिसरात पाणी येत नाही तर काही ठिकाणी दोन-तीन दिवसांनी पाणी येते अशा स्थितीत लोकांनी काय करायचे हा प्रश्न निर्माण झाल्याने महापालिकेने दिव्यातील नागरिकांना पुढील 2 आठवडे मोफत पाणी पुरवठा टँकरद्वारे करावा अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
#IndiaFightsCorona रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली मोठी घोषणा.
— Lokmat (@MiLOKMAT) March 27, 2020
संपूर्ण बातमीसाठी क्लिक करा- https://t.co/hDijdywtFFpic.twitter.com/hWLU2CLKQ6
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाचा गुगल, फेसबुकला फटका; तब्बल 4400 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता
Coronavirus: देशासाठी सदैव तत्पर! कोरोनाग्रस्तांसाठी CRPF चा पुढाकार, 33 कोटी 81 लाखांची केली मदत
Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव, कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर
Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय
Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली?