आगाऊ कर भरा, सवलत मिळवा

By admin | Published: April 26, 2017 11:56 PM2017-04-26T23:56:13+5:302017-04-26T23:56:13+5:30

विविध करांची वसुली वेळेत करण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या

Make advance taxes, get discounts | आगाऊ कर भरा, सवलत मिळवा

आगाऊ कर भरा, सवलत मिळवा

Next

ठाणे : विविध करांची वसुली वेळेत करण्यासाठी ठाणे महापालिकेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या इतिहासात प्रथमच मालमत्ताकराची बिले छापून तयार झाली असून २ मे पासून ती मालमत्ताधारकांच्या हाती पडणार आहेत. जे मालमत्ताधारक चालू वर्षाचे बिल आगाऊ भरतील, त्यांना मालमत्ताकरात १० टक्के सवलत मिळणार आहे.
महापालिकेने मागील आर्थिक वर्षात म्हणजेच २०१६-१७ मध्ये विविध करांच्या स्वरूपात १८१६ कोटींची वसुली केली आहे. यामध्ये मालमत्ताकराची वसुली ३८०.५१ कोटी आहे. परंतु, लक्ष्यापेक्षा ती कमीच असल्याचे दिसून आले आहे. याची कारणेदेखील अनेक आहेत. काही वेळेस मालमत्ताधारकांच्या हाती बिले न पडणे, थकबाकी नसताना ती दाखवणे, कर्मचाऱ्यांची कमतरता ही कारणे यामागे आहेत. यावर उपाय काढण्याचे पालिकेने निश्चित केले आहे.
त्यानुसार, वेळेआधीच मालमत्ताधारकांच्या हाती बिले देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षी मे महिन्यात ही बिले छापून तयार झाली होती. यंदा मात्र एप्रिलअखेरच ती छापून तयार असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालमत्ताधारकांच्या हाती पडणार आहेत. यासाठी पालिकेचे कर्मचारी कामाला लागले आहेत. याशिवाय, आॅनलाइन बिलेदेखील तयार असल्याचा दावा मालमत्ताकर विभागाने केला आहे.
महापालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना कराची बिले वेळेवर मिळावीत, यासाठी प्रशासनाने टपाल खात्याद्वारे कराची बिले पाठवण्यास सुरु वात केली होती. परंतु, अनेक मालमत्ताधारकांना ती वेळेवर मिळाली नव्हती. यापैकी काही मालमत्ताधारकांच्या घरी ती पोहोचलेली नसताना कराच्या थकबाकीसंबंधीच्या पाठवलेल्या नोटिसा मात्र घरपोच केल्या होत्या. त्यामुळे टपाल खात्यामार्फत करांची बिले पाठवण्याची योजना वादात सापडली होती. तसेच या योजनेवरून प्रशासनावर टीकेचा भडीमार होऊ लागला होता. (प्रतिनिधी)

Web Title: Make advance taxes, get discounts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.