रुग्णालयांमध्ये जनरेटर उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:39 AM2021-05-16T04:39:19+5:302021-05-16T04:39:19+5:30
------------ जिल्ह्यात या १४ आस्थापना, कार्यालयांना सतर्क राहण्याचे आदेश ताउते चक्रीवादळास तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालये, अन्य रुग्णालये, ...
------------
जिल्ह्यात या १४ आस्थापना, कार्यालयांना सतर्क राहण्याचे आदेश
ताउते चक्रीवादळास तोंड देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालये, अन्य रुग्णालये, ठाणे शहर, नवी मुंबई, मीरा भाईंदर, आदी पोलीस आयुक्त, जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मीरा भाईंदर, उल्हासनगर या सहा महापालिकांचे आयुक्त; ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर येथील वाहतूक नियंत्रण शाखा, ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर येथील उपविभागीय अधिकारी, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ.
तहसिलदार ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड आणि अप्पर तहसीलदार मीरा भाईंंदर. कार्यकारी अभियंता- नॅशनल हायवे सुरत, जिल्हा आरोग्याधिकारी, ठाणे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या उपाययोजनेसाठी टोरंट पॉवर, अदानी पॉवर, आदींसह लिंडे कंपनी, आयनॉक्स कंपनी, जे. एस. डब्ल्यू. आदी जिल्ह्यांतील १४ जबाबदार आस्थापनांना सज्जतेचे आदेश ठाणे जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
..........
वाचली