मेक इन इंडिया मेट्रो कोच चीनपेक्षा स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 05:31 AM2018-10-25T05:31:17+5:302018-10-25T05:31:19+5:30

मुंबई मेट्राचे जाळे विस्तारत असताना यातील दोन मेट्रो मेक इन इंडियाअंतर्गत भारतात निर्माण होणार आहेत.

Make in India Metro coach cheaper than China | मेक इन इंडिया मेट्रो कोच चीनपेक्षा स्वस्त

मेक इन इंडिया मेट्रो कोच चीनपेक्षा स्वस्त

Next

- नारायण जाधव 

ठाणे : मुंबई मेट्राचे जाळे विस्तारत असताना यातील दोन मेट्रो मेक इन इंडियाअंतर्गत भारतात निर्माण होणार आहेत. त्यासाठीची आॅर्डरही महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वेच्या उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील मेट्रो कोच फॅक्टरीला दिली आहे. भारतात निर्माण केलेल्या त्या पहिल्या मेट्रो असणार असून कॅनडास्थित बम्बार्डिअर कंपनीच्या उत्पादनापेक्षा सरस असे हे मेट्रो कोच राहणार आहेत. विशेष म्हणजे रोबोटद्वारे त्यांची निर्मिती केली जात असून अशा प्रकारची देशातील पहिलीच कोचनिर्मिती फॅक्टरी आहे.
यातील एका कोचची किंमत आठ कोटींच्या घरात असून ती
चीन, कोरिया आणि इतर देशांच्या तुलनेत किती तरी स्वस्त आहे. मेक
इन इंडिया मोहिमेमुळे प्रति कोच देशाचे चार कोटी रुपये वाचणार आहेत. शिवाय सुरक्षितता, दर्जाबाबत हे कोच त्यांच्यापेक्षा सरस राहणार आहेत.
>अशा असणार सुविधा
रायबरेली येथील फॅक्टरीत निर्माण होणाऱ्या मेट्रो कोचमध्ये वायफाय सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइल चार्जिंग पॉइंट, आॅटोमॅटिक दरवाजांसह सिग्नलिंगद्वारे विविध सूचना देणारी यंत्रणा असणार आहे.

Web Title: Make in India Metro coach cheaper than China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.