भाईंदर रेल्वे स्थानक बाहेर बेकायदा मुताऱ्यांचा महिला व पुरुष प्रवाश्याना जाच 

By धीरज परब | Published: January 18, 2023 08:15 PM2023-01-18T20:15:26+5:302023-01-18T20:15:59+5:30

एकीकडे स्वच्छतेच्या मोहिमा चालवल्या जात असताना भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस रेल्वे पुला खालच्या कोपऱ्यांचा वापर चक्क मुताऱ्या म्हणून केला

Male and female passengers are approached by illegal immigrants outside Bhayandar railway station | भाईंदर रेल्वे स्थानक बाहेर बेकायदा मुताऱ्यांचा महिला व पुरुष प्रवाश्याना जाच 

भाईंदर रेल्वे स्थानक बाहेर बेकायदा मुताऱ्यांचा महिला व पुरुष प्रवाश्याना जाच 

googlenewsNext

मीरारोड -

एकीकडे स्वच्छतेच्या मोहिमा चालवल्या जात असताना भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस रेल्वे पुला खालच्या कोपऱ्यांचा वापर चक्क मुताऱ्या म्हणून केला जात असल्याने सर्वसामान्य हजारो महिला व पुरुष प्रवाश्याना दुर्गंधी सहन करत मूत्रातून मार्ग काढावा लागत आहे . 

भाईंदर रेल्वे स्थानकात ये - जा करण्यासाठी मध्यभागी रेल्वेचा मोठा जिना आहे . तर बालाजी नगर येथून आणखी एक नवीन रेल्वे पादचारी पुल बांधण्यात आला आहे .  ह्या दोन्ही पुलांचे जिने अरुंद चिंचोळ्या गल्लीत उतरतात . त्याच चिंचोळ्या गल्लीतून रोजचे हजारो प्रवासी ये जा करतात . परंतु मध्यभागी असलेल्या पुलाच्या लगत तसेच नवीन बांधलेल्या पुलाच्या जिन्या खालील कोपऱ्यात दिवस रात्र अनेक  निर्लज्ज प्रवासी हे उघडणपणे लघवी करत असतात . ठिकठिकाणी लघवी केली जात असल्याने त्याची दुर्गंधी ह्या संपूर्ण परिसरात पसरते . दुर्गंधी सहन करत वा नाकावर रुमाल बांधत महिला व पुरुष प्रवाश्याना रोजची ये - जा करावी लागते . 

बेकायदा मुताऱ्यांची दुर्गंधी तर सहन करावी लागतेच पण लघवीचा प्रवाह येण्या जाण्याच्या अरुंद गल्लीत पसरत असल्याने मूत्रातून कसाबसा मार्ग महिला व पुरुष प्रवाश्याना काढावा लागतो . रात्रीच्या वेळी तर गल्लीत सर्वत्र मूत्र पसरलेले असल्याने महिलांना घाणीतून चालणे उबग आणणारे ठरत आहे . 

या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था नाही . तर जिन्या खालील कोपरे सुद्धा मोकळे असल्याने रात्रीच्या काळोखात तर सर्रास लघवी करणाऱ्या पासून मद्यपान आदी प्रकार सुद्धा चालतात . मध्यंतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदा दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने प्रवाश्याना ये - जा करणे त्रासाचे ठरत होते . दुचाकी आता बंद झाल्या असल्या तरी बेकायदा मुताऱ्यांचा जाच त्रासदायक ठरत आहे . 

रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे सुरक्षा बल सह रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्या कडून ह्या बेकायदा मुताऱ्यांच्या गलिच्छ व जाचक प्रकारा कडे दुर्लक्ष केले जात असल्या बद्दल प्रवाश्यां कडून नाराजी व्यक्त होत आहे .  तर संबंधित बेजबाबदार रेल्वे अधिकाऱ्यांसह लघवी करणाऱ्या लोकांवर कारवाई करा व परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी उपविभाग प्रमुख रविन्द्र भोसले यांनी केली आहे . 

Web Title: Male and female passengers are approached by illegal immigrants outside Bhayandar railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.