मॉल, स्विमिंग पूल, जिमला सवलत नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 01:23 AM2020-08-01T01:23:40+5:302020-08-01T01:24:09+5:30

लॉकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत कायम : ठामपाचा निर्णय, मुंबईच्या तुलनेत ठाण्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या जास्त असल्याने चिंता

Mall, swimming pool, gym are not open till 31 august 2020 | मॉल, स्विमिंग पूल, जिमला सवलत नाहीच

मॉल, स्विमिंग पूल, जिमला सवलत नाहीच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यभरात १ आॅगस्टपासून मिशन बिगिन अगेनच्या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध महाराष्ट्र सरकारने शिथिल केले असले, तरी ठाण्यातील लॉकडाऊनमध्ये ३१ आॅगस्टपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन कायम आहे. यात राज्यात मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सला ५ आॅगस्टपासून सुरू करण्यास परवानगी दिली असली, तरी ठाण्यात मात्र मॉल, मार्केट, कॉम्प्लेक्स, जिम व स्विमिंग पूल सुरू करण्याबाबतचे निर्बंध अद्यापही कायम राहणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ठाणे शहरात आधीच कडक लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र, तो सुरू असतानाही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे, सध्या मुंबईपेक्षा ठाण्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. ही बाब ध्यानात घेऊनच ठाणे महापालिकेने कठोर निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात नव्याने सुरू झालेला लॉकडाऊन १९ जुलैपासून शिथिल केला होता. हॉटस्पॉटमध्ये तो अद्याप कायम असून, तो आता ३१ आॅगस्टपर्यंत कायम राहणार आहे.

भाजीमंडईसह बाजारपेठांना : समविषम तत्त्वावर परवानगी
लॉकडाऊनच्या काळात मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, जिम व स्विमिंग पूल वगळता सर्व भाजीमंडया, बाजारपेठा आणि दुकाने सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेत सम व विषम तत्त्वावर सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. अटी व नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे.

स्पॉट क्षेत्रे
कळवा प्रभाग समिती : भाविक विद्यालयाच्या लगतचा भाग, विठ्ठल मंदिर रोड, बुबेरा रोड, दत्तवाडी, मुंबई-पुणे रोड (दक्षिण), गजानन महाराज मंदिर (पूर्व), ६० फूट रोड (पश्चिम), वास्तू आनंद कॉम्प्लेक्स, गोविंदधाम सोसायटी, कळवानाका, मुंबई-पुणे रोड (उत्तर), चेऊलकर रोड (पश्चिम), जानकीबाई साळवी मार्केट रोड, शिवाजीनगर, शिवाजीनगर मार्केट, शिवाजी तलाव, विटावा.
माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती : आझादनगरचा भाग, जैन मंदिर रोड, मनोरमानगर, ढोकाळी छबिया पार्क मधील इमारती, कापूरबावडी.
उथळसर प्रभाग समिती : वृंदावन सोसायटी फेज २, मुंबई-आग्रा हायवे, रोड न ३, रुस्तमजी
कावेरी इमारत रुस्तमजी एक्वा इमारत, निकम
गुरुजी रोड, इमारत क्रमांक ३१ ए,२६ ए, साईदीप कॉम्प्लेक्स सिद्धेश्वर तलावालगतचा भाग, महादेव गोपाल पाटील रोड नितीन कंपनीसमोरील भाग, नामदेव वाडी भाग.

वागळे प्रभाग समिती : शांतीनगरचा भाग, आयटीआय इमारत, किसनगरचा भाग, तानसा पाइपलाइन,नेपच्यून एलिमेंट वाणिज्य इमारत,आश्रम रोड.
नौपाडा-कोपरी प्रभाग समिती : आनंदनगर, दौलतनगर,साई एकवीरा सोसायटी कोपरी, महापालिका शाळा सिंधी कॅम्प इमारत क्रमांक २२,कृष्णा बोरकर मार्ग,पारशीवाडी गुरुनानक सोसायटी,हरिश्चंद्र राऊत मार्ग, प्रेमनगर सोसायटी, चेंदणी कोळीवाडा, पारसीयन रोड, मीठबंदर रोड.
वर्तकनगर प्र. समिती : हॅपी व्हॅली होम्स, टिकुजिनीवाडी रोड, कांचन पवारनगर, वसंत विहार, धर्मवीरनगरचा भाग, तुलसीधाम रोड, वर्तकनगर, भीमनगर, वसंत लॉन्स, गणेशनगरचा भाग.
लोकमान्य - सावरकरनगर : यशोधननगर, लोकमान्य बसस्टॉप, दोस्ती रेंटल, संभाजीनगरचा भाग, लोढा पॅराडाइज, कामगार हॉस्पिटल, रामचंद्रनगरचा भाग.

Web Title: Mall, swimming pool, gym are not open till 31 august 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.