पुन्हा भात करणार मालामाल; शेतकऱ्यांची यंदा खरिपातही पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 04:07 PM2022-04-18T16:07:12+5:302022-04-18T16:10:01+5:30

- सुरेश लोखंडे ठाणे : यंदाच्या खरीप हंगामाची पूर्वतयारी ठाणे जिल्हा परिषद कृषी विभागासह जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयाने हाती ...

Malmal will make rice again; Farmers this year | पुन्हा भात करणार मालामाल; शेतकऱ्यांची यंदा खरिपातही पसंती

पुन्हा भात करणार मालामाल; शेतकऱ्यांची यंदा खरिपातही पसंती

Next

- सुरेश लोखंडे

ठाणे : यंदाच्या खरीप हंगामाची पूर्वतयारी ठाणे जिल्हा परिषद कृषी विभागासह जिल्हा कृषी अधीक्षकांच्या कार्यालयाने हाती घेतली. यंदाही प्रमुख खरीप पीक असलेल्या भाताची पेरणी करण्याचे नियोजन आहे. त्यातून तब्बल ५४ हजार ९७७ हेक्टरमध्ये भाताची लागवड करण्यात येईल. तूर सात हजार ५५८ हेक्टरवर घेतली जाणार आहे. भाताच्या २२ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवली. त्यातून १४ हजार ३१२ क्लिंटल बियाण्याची आवश्यक आहे. पिकासाठी आवश्यक १२ हजार ४८९ मेट्रिक टन खताची मागणी केली असता ११ हजार ४९० मेट्रिक टन खत मंजूर झाल्याची माहिती ठाणे जि. प.च्या कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यातील खरिपाचे भात हे प्रमुख पीक आहे. जिल्ह्यात नागली, वरीच्या पिकासही शेतकऱ्यांची पसंती आहे. यंदा नागली - वरी दोन हजार २४७ हेक्टरवर बहरणार आहे. याखालोखाल पावसाळी भाजीपाला दोन हजार ३२३ हेक्टरवर घेण्याचे नियोजन यंदाच्या पावसाळ्यात करण्यात आले. खरीप हंगामात येणाऱ्या अडचणी, खते, बियाणे यांचे नियोजन, खतांचा शिल्लक साठा, विक्री करताना येणाऱ्या अडचणी, नॅनो युरियाचा वापर व त्याचे फायदे, आपले सरकार पोर्टलवर करावयाची नोंदणी, कृषिक ॲपच्या वापराविषयीच्या माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाची खरीपपूर्व आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा सभा पार पडली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, कृषी विकास अधिकारी सारिका शेलार, मोहीम अधिकारी तात्यासाहेब कोळेकर, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी तृप्ती वाघमोडे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विजय तुपसौंदर्य, यांच्यासह कृषीचे सर्व अधिकारी, जिल्ह्यातील सर्व खत विक्रेते आणि कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१) प्रस्तावित खरीप पेरणी - भात - ५४,९७७ हेक्टरवर, नाचणी, वरी - २,२४७ हेक्टर, तूर - ७,५५८, भाजीपाला- २,३२३ हेक्टर.

प्रस्तावित बियाणे - भात - २२,००० क्विंटल, नाचणी व वरीचे वाण शेतकरी स्वत:कडील वापरतात.

आवश्यक बियाणे - भात बियाणे - २२,००० क्विंटल.

बियाण्याची मागणी - भात बियाण्याची मागणी १४,३१२ क्विंटल. यामध्ये महाबीजचे ३,५०० क्विंटल, खासगी कंपन्यांच्या १०,८१२ क्विंटलचा समावेश आहे.

२) खत पुरवठ्याची तयारी-

खताचे नाव- मागणी- मंजूर खत मे. टनमध्ये -

युरिया - ९,८०० - ९,६६० मे. टन

डीएपी - २०० - १८०

संयुक्त खते - २,२५४ - १,५५०

इतर खते - २३५ - १००

१) यंदाच्या खरीप हंगामासाठी वापरण्यात येणाऱ्या बियाणांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्ह्यात सहा भरारी पथके स्थापन केली आहेत. जिल्ह्यात बोगस बियाणे, खते विकण्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

- कृषी विभाग, जि. प., ठाणे

सध्या शेतीची बांधबंदिस्ती, खरीपपूर्व राबणीची कामे चालू आहेत. खरीप हंगामात खतांचा तुटवडा पाहता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बी - बियाण्यांच्या सोबत खते उपलब्ध करून द्यावीत.

- संदीप शेलवले, शेतकरी, पिवळी, ता. शहापूर

भात लागवडीपूर्वी जमिनीची मशागत पूर्ण केली आहे. उत्तम बियाणे व योग्य खते वापरून चांगले पीक घेण्याचे नियोजन आहे. पण, हे सर्व लहरी मान्सूनवर अवलंबून आहे.

- रवींद्र जाधव, विश्वगड, ता. भिवंडी

Web Title: Malmal will make rice again; Farmers this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी