ठाण्यात लहान मुलांची भांडणे सोडविणाऱ्याचा कैचीने खून करणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:02 AM2020-10-08T01:02:45+5:302020-10-08T01:06:28+5:30
लहान मुलांची भांडणे सोडविणाºया चिंतन पांचाळ (३१) याची कैचीने हत्या करणाºया निहाल बेलोसे (२५) आणि आदित्य चौधरी (२५) या दोघांनाही श्रीनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. निहाल याने त्याच्याकडील कैचीने चिंतनच्या पाठीवर, बरगडीवर सपासप वार यातच गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पूर्ववैमनस्यातून लहान मुलांची भांडणे सोडविणाºया चिंतन पांचाळ (३१, रा. किसननगर क्रमांक ३, ठाणे) याची कैचीने हत्या करणा-या निहाल बेलोसे (२५, रा. चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे) आणि आदित्य चौधरी (२५, रा. भटवाडी, किसननगर क्रमांक ३, ठाणे) या दोघांनाही श्रीनगर पोलिसांनी बुधवारी सायंकाळी अटक केली. या दोघांविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वागळे इस्टेट परिसरातील किसननगर येथे राहणाºया चिंतन याचा आदित्य आणि निहाल या दोघांबरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याची सल या दोघांच्याही मनात होती. त्यातच बुधवारी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास लहान मुलांची भांडणे झाली होती. हीच भांडणे चिंतन याने सोडविली. भांडणे सोडविल्याच्या रागातून आदित्य याने चिंतनला समोरून घट्ट पकडून ठेवले तर त्याचा साथीदार निहाल याने त्याच्याकडील कैचीने चिंतनच्या पाठीवर, बरगडीवर सपासप वार केले. या हल्ल्यात चिंतन तिथेच रक्ताच्या थारोळयात कोसळला. त्याला गंभीर जखमी अवस्थेतच जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला. हत्येनंतर पसार झालेल्या निहाल आणि आदित्य यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनकर चंदनकर, उपनिरीक्षक राकेश गोसावी, महेश मोरे, माणिक इंगळे, वनपाल व्हनमाने, राजू जाधव आणि निलेश धुत्रे आदींच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी मुंबईतून अटक केली. आदित्य हा बाहेरगावी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
* हत्येनंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हत्येनंतर पसार झालेल्या दोन्ही आरोपींना शोधण्याचे आदेश त्यांनी श्रीनगर पोलिसांना दिले होते. या खूनानंतर मुंबईत पसार झालेल्या दोघांनाही श्रीनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये शिताफीने अटक केली. या कारवाईनंतर पोलीस आयुक्तांनी श्रीनगर पोलिसांचे कौतुक केले.