लोखंडी सामानाची चोरी करणाऱ्यास रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 01:13 AM2021-05-01T01:13:57+5:302021-05-01T01:14:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : वाघबीळ येथील एका बांधकाम साईटवरुन लोखंडी सामानाची चोरी करणाºया अनिलकुमार महतो (२५, रा. वाघबीळ, ...

Man arrested for stealing iron goods | लोखंडी सामानाची चोरी करणाऱ्यास रंगेहाथ अटक

कासारवडवली पोलिसांनी घेतले ताब्यात

Next
ठळक मुद्दे कासारवडवली पोलिसांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाघबीळ येथील एका बांधकाम साईटवरुन लोखंडी सामानाची चोरी करणाºया अनिलकुमार महतो (२५, रा. वाघबीळ, ठाणे) याला दक्ष नागरिकांच्या मदतीने कासारवडवली पोलिसांनी रंगेहाथ गुरुवारी अटक केली. त्याच्याकडून १८ हजारांचा ऐवजही ताब्यात घेण्यात आला आहे.
वाघबीळ येथील विजय ग्रृपच्या ओरोविया या साईटवर पाणी पुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरचा चालक अनिलकुमार याने २८ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास १८ लोखंडी पाईपसह इतर सामान टँकरच्या कॅबिनमध्ये ठेवून ते चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रकार तेथील एका कामगाराच्या निदर्शनास आल्यामुळे तो पकडला गेला. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

Web Title: Man arrested for stealing iron goods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.