ठाण्यात मनोरुग्ण मुलाने केला पित्यावर चाकू हल्ला; फिरायला न नेल्याचा राग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 08:56 PM2017-11-29T20:56:03+5:302017-11-29T20:56:16+5:30
आपल्याच पित्यावर चाकूने वार करणा-या सागर सांगळे (२४) याला श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
ठाणे : आपल्याच पित्यावर चाकूने वार करणा-या सागर सांगळे (२४) याला श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
किसननगर येथील रहिवासी नामदेव सांगळे हे २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातील हॉलमधील पलंगावर मोबाइल पाहत बसले होते. त्याच वेळी त्यांचा मुलगा सागरने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. त्यांच्या पोटावर, मांडीवर आणि हातावर त्याने वार केल्याने यात ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून २८ नोव्हेंबर रोजी सकाळी सागरला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक बी.पी. बनसोडे यांनी दिली.
फिरायला न नेल्याचा राग
सागर मनोरुग्ण असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याच्या या मानसिक आजारामुळे त्याला वडील नामदेव हे बाहेर जाऊ देत नव्हते. यातूनच आलेल्या रागातून त्याने आपल्या वडिलांवर चाकूने हल्ला केला, अशी फिर्याद त्याच्या आईने मुलाविरुद्ध दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.