उल्हासनगरात संपत्तीच्या वादातून दिराने भावजयला चाकूने भोसकले, गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: April 30, 2024 20:18 IST2024-04-30T20:18:35+5:302024-04-30T20:18:54+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं-२, शिरू चौकात राहणाऱ्या वृद्ध भावाजयला दिराने चाकूने भोसकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. उल्हासनगर पोलिसांनी काही ...

उल्हासनगरात संपत्तीच्या वादातून दिराने भावजयला चाकूने भोसकले, गुन्हा दाखल
उल्हासनगर: कॅम्प नं-२, शिरू चौकात राहणाऱ्या वृद्ध भावाजयला दिराने चाकूने भोसकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. उल्हासनगर पोलिसांनी काही तासात दिराला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-२, शिरू चौकात राहणाऱ्या ७० वर्षाच्या दुर्गाबाई भाटिया व त्यांचे दिर प्रकाश भाटिया यांच्यात मंगळवारी सकाळी मालमत्ता वाद झाला. या वादातून भाटीया याने चाकूने हल्ला करून दुर्गाबाईस जखमी केले. चाकू हल्ल्यानंतर प्रकाश भाटिया हातेथून पळून गेला.
नातेवाईक व शेजाऱ्यांनी जखमी दुर्गाबाई यांना मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने, त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पळून गेलेल्या प्रकाश भाटिया याला काही तासात अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.