मनपा पोटनिवडणुकीवरही बहिष्कार!

By admin | Published: March 14, 2016 02:27 AM2016-03-14T02:27:50+5:302016-03-14T02:27:50+5:30

कल्याण-डोंबिवली मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहिष्कार उठवून २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती निवडणुकीला सामोरे गेली

Manapata boycott on by-election! | मनपा पोटनिवडणुकीवरही बहिष्कार!

मनपा पोटनिवडणुकीवरही बहिष्कार!

Next

अरविंद म्हात्रे,  चिकणघर
कल्याण-डोंबिवली मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहिष्कार उठवून २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती निवडणुकीला सामोरे गेली. मात्र, आता जाहीर झालेल्या प्रभाग क्रमांक ११४ आणि ११९ या दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
येत्या १७ एप्रिलला ही पोटनिवडणूक होणार असून शनिवारी संघर्ष समितीची जाहीर सभा घेण्यात आली. त्या सभेत बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केल्याची माहिती समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेने आधीच संघर्ष समितीपासून फारकत घेतलेली असल्याने ते बहिष्कारात सामील होतात की नाही, याबाबत त्यांची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे. ‘संघर्ष समितीने बहिष्कार जाहीर केला, हा त्यांचा निर्णय आहे. शिवसेना समितीत नसल्याने बहिष्काराचा निर्णय आम्हाला बंधनकारक नाही. शिवसेना निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका वेगळी असू शकते.’
-प्रकाश म्हात्रे, शिवसेना नेते, २७ गावे, कल्याण
‘गावे जर महापालिकेतून वगळणारच असतील तर निवडणूक घेऊन जनतेच्या पैशांची उधळपट्टी कशाला? निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणूक कार्यक्र म घेण्याचे कामच आहे. मनसे पोटनिवडणूक लढवणार नाही. शिवसेनेनेसुद्धा सामंजस्य दाखवायला हवे.’
- राजू पाटील, प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Web Title: Manapata boycott on by-election!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.