उल्हासनगरातील व्हिटीसी मैदान खेळाडू व मुलांसाठी खुले करण्याची मनविसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2018 07:49 PM2018-01-18T19:49:19+5:302018-01-18T19:49:22+5:30

खेळाडू व मुलांच्या सोयीसाठी व्हिटीसी मैदान दुरस्ती करण्यात केले. मात्र उद्घाटनाच्या श्रेयासाठी खेळाडू व मुलांना मैदाना पासून वंचित करू नका. असा सल्ला मनविसेने देवून तसे निवेदन महापौर, आयुक्तांना दिल्याची माहिती जिल्हाउपाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली.

Manavisa's demand to open Vitasi grounds and children in Ulhasnagar | उल्हासनगरातील व्हिटीसी मैदान खेळाडू व मुलांसाठी खुले करण्याची मनविसेची मागणी

उल्हासनगरातील व्हिटीसी मैदान खेळाडू व मुलांसाठी खुले करण्याची मनविसेची मागणी

Next

 उल्हासनगर - खेळाडू व मुलांच्या सोयीसाठी व्हिटीसी मैदान दुरस्ती करण्यात केले. मात्र उद्घाटनाच्या श्रेयासाठी खेळाडू व मुलांना मैदाना पासून वंचित करू नका. असा सल्ला मनविसेने देवून तसे निवेदन महापौर, आयुक्तांना दिल्याची माहिती जिल्हाउपाध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिली.

उल्हासनगरात जेमतेम ३ मैदाने असून त्यापैकी गोलमैदान व दसरा मैदान विविध सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमाला भाडयांने दिले जाते. राहिलेले एकमेव व्हिटीसी मैदानाची दैनावस्था झाली होती. स्थानिक नगरसेवक व विरोधी पक्ष नेता धनंजय बोडारे यांच्या पुढाकाराने येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने अत्याधुनिक क्रिडा संकुलाचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला. त्यापुर्वी मैदानाची रंगरंगोटी व दुरस्ती करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्याकडे केली. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी मैदानाच्या दुरस्तीला परवानगी दिली.
व्हिटीसी मैदानाची दुरस्ती झाल्यानंतर विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांच्या पुढाकाराने मैदानाचे लोकार्पण सोहळा खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्ष नेता धनंजय बोडारे यांच्या हस्ते पार पडला. महापालिकेच्या परवानगी विना झालेल्या लोकार्पण सोहळयाला आयुक्तासह पालिका अधिकारी, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सभाग%ह नेता यांच्यासह पक्ष पदाधिकारी यांनी दांडी मारली. शिवसेनेने श्रेय घेण्यासाठीच मैदानाचे लाकार्पण सोहळा केल्याची टिका सत्ताधारी भाजपसह इतर पक्षाकडून झाली.

Web Title: Manavisa's demand to open Vitasi grounds and children in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.