सोशल मीडियाच्या आढीत आंबा; मनसे-भाजपा कार्यकर्त्यांची फेसबुकवर शिवीगाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 11:54 PM2019-05-11T23:54:47+5:302019-05-11T23:55:12+5:30

शहरातील भाजप आणि मनसेत सुरू झालेल्या वादाचे निमित्त ठरलेल्या आंब्याचा स्टॉल शनिवारी सकाळी गुंडाळल्यानंतर या वादाचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर उमटण्यास सुरूवात झाली आहे.

Mango in social media; MNS-BJP workers clash on Facebook | सोशल मीडियाच्या आढीत आंबा; मनसे-भाजपा कार्यकर्त्यांची फेसबुकवर शिवीगाळ

सोशल मीडियाच्या आढीत आंबा; मनसे-भाजपा कार्यकर्त्यांची फेसबुकवर शिवीगाळ

Next

ठाणे : शहरातील भाजप आणि मनसेत सुरू झालेल्या वादाचे निमित्त ठरलेल्या आंब्याचा स्टॉल शनिवारी सकाळी गुंडाळल्यानंतर या वादाचे जोरदार पडसाद सोशल मीडियावर उमटण्यास सुरूवात झाली आहे. दिवा -शीळ येथील भाजप युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील यांनी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना हिंमत असेल तर स्टॉल सुरु करून दाखव, बायकांच्या आड राहून हुल्लडबाजी करू नकोस, अशी पोस्ट सोशल मीडियावर टाकून आव्हान दिले आहे. त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे. मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांवर टीका करताना खालची पातळी गाठली आहे.
याबाबत अविनाश जाधव म्हणाले की, निलेश पाटील हा आमच्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याचा भाऊ असून मध्यंतरी त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा इशारा मी गांभीर्याने घेत नाही. मात्र स्टॉल हटवावा लागला याचा राग ठाण्यात १७ मे रोजी काढण्यात येणाºया मोर्चादरम्यान दिसेल असा प्रतिइशारा त्यांनी दिला.
विष्णूनगर येथे मनसेकडून शेतकरी बाजाराकरिता मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडे मागितली होती. तशी परवानगी दिली होती. तेथील शेतकºयाच्या स्टॉलवरून भाजप आणि मनसे कार्यकर्ते गुरुवारी रात्री आमने-सामने भिडले. हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. याप्रकरणी २० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले. दरम्यान, या स्टॉलची परवानगी नाकारल्यावर तो स्टॉल कायद्याचे पालन करुन शनिवारी सकाळी बंद केल्याचे मनसेकडून सांगण्यात येते. दरम्यान मनसेने शेतकºयांसाठी १७ मे रोजी मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे. शनिवारी दुपारी भाजप पदाधिकाºयाने फेसबुकवर पोस्ट टाकून जाधव यांना थेट इशारा दिला. त्यामुळे या पक्षांतील वाद आता सोशल मीडियाकडे वळला आहे. भाजप पदाधिकाºयाच्या पोस्टनंतर मनसे व भाजप कार्यकर्त्यांनी अत्यंत खालची पातळी गाठत, एकमेकांना खुलेआम शिवीगाळ सुरू केली आहे. दरम्यान, मनसेच्या अतिक्रमणाविरोधात आंदोलन करणाºया कार्यकर्त्यांचा भाजप शहराध्यक्ष संदीप लेले यांनी शनिवारी सत्कार केला.

लाव रे तो व्हिडीओमुळे चिघळला वाद
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. मोदींच्या दुटप्पी भूमिकेवर बोट ठेवण्याकरिता ‘लाव रे तो व्हीडिओ’, अशी हाक ते देत होते व त्यामुळे महाराष्ट्रात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे चिडलेल्या भाजपने मनसेनी लावलेल्या स्टॉलवरून वाद उकरून काढला व त्याला संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले.

Web Title: Mango in social media; MNS-BJP workers clash on Facebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे