'ते' घृणास्पद कृत्य करून महिलांनीच रचला बनाव; माणिकपूर पोलिसांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:43 PM2024-08-17T12:43:09+5:302024-08-17T12:43:22+5:30

कंपनीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अर्ज देण्यात आला होता.

Manikpur Police Information abou women case | 'ते' घृणास्पद कृत्य करून महिलांनीच रचला बनाव; माणिकपूर पोलिसांची माहिती

'ते' घृणास्पद कृत्य करून महिलांनीच रचला बनाव; माणिकपूर पोलिसांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- वसईतील एका कंपनीत पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत लघवी टाकून महिलांना दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पण हे किळसवाणे कृत्य कोणी केले नसून त्या महिलांनीच हा बनाव रचला असल्याची माहिती माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी लोकमतला सांगितले.

वसईतील या कंपनीत इमिटेशन ज्वेलरीचे काम सुरू असून येथील युनिट बंद होणार असून या महिलांना पगार मिळाला नसल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचेही माने यांनी सांगितले. याप्रकरणी त्यांनी कोणतीही बाटली दाखवली नसून फक्त अर्ज दिला आहे. त्याची चौकशी व तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. हे केलेले कृत्य साधारण असून यात कोणती बातमी तरी होते का असेही धक्कादायक माहितीही माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी लोकमतला दिली.

काय नेमकी घटना

शुक्रवारी माणिकपूर पोलीस ठाण्यात एका कंपनीने पिण्याच्या पाण्यात लघवी टाकून दिल्याची तक्रार देण्यासाठी कंपनीत काम करणाऱ्या काही महिला पोलीस ठाण्यात आल्या होत्या. त्यांनी कंपनीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अर्ज देण्यात आला होता.

Web Title: Manikpur Police Information abou women case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.