मनोज म्हात्रे हत्या प्रकरण : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

By admin | Published: May 30, 2017 04:10 AM2017-05-30T04:10:24+5:302017-05-30T04:10:24+5:30

भिवंडीतील काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ठाणे शहर

Manoj Mhatre murder case: Extension of filing nomination papers | मनोज म्हात्रे हत्या प्रकरण : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

मनोज म्हात्रे हत्या प्रकरण : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : भिवंडीतील काँग्रेसचे नगरसेवक मनोज म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ठाणे शहर पोलिसांना ठाणे विशेष न्यायालयाने आणखी दीड महिन्याची मुदत वाढवून दिली आहे. एकंदरीत, एखाद्या गुन्ह्यात ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असले, तरी या प्रकरणात ठाणे पोलिसांना आणखी ४५ दिवस वाढवून मिळाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
भिवंडी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे फेब्रुवारीत मनोज म्हात्रे यांची प्राणघातक हल्ला करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर दिवसेंदिवस राजकीय हस्तक्षेप वाढू लागले होते. याचदरम्यान, हे प्रकरण ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले. त्यातच, या हत्येप्रकरणी २० जणांवर ठाणे शहर पोलिसांनी मोक्का लावला. त्यानंतर, या हत्येप्रकरणी ठाणे शहर सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्यासह ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख एन. टी. कदम यांच्या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी धाडसत्र सुरू केले. यामध्ये म्हात्रे यांच्या अंगरक्षकासह मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे व या हत्येत सहभागी असलेल्या एकूण १३ जणांना आतापर्यंत अटक केली आहे. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून, ते सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणी हत्येमध्ये आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
याच दरम्यान, ठाणे शहर पोलिसांनी ठाणे विशेष न्यायालयात या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी काही दिवस मिळावेत, अशी विनंती केली होती. ती न्यायालयाने मंजूर करून आणखी ४५ दिवस वाढवून दिले आहेत. त्यामुळे सक्षम पुराव्यांचा दोषारोपपत्रात समावेश असेल, अशी खात्री पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

दोषारोपपत्र ४ हजार पानांचे?
या हत्येचे दोषारोपपत्र जवळपास चार हजार पानांचे होण्याची शक्यता आहे, तसेच हत्येसाठी वापरलेले शस्त्र, घटनास्थळी मिळालेले पुरावे, व्हायरल झालेली व्हिडीओ क्लिप, आरोपींचा कबुलीजबाब आदी गोष्टी पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत.

गैरसमजुतीतून हत्या?
म्हात्रे यांची हत्या गैरसमजुतीतून झाल्याचे तपासात समोर आले आहे. प्रशांत म्हात्रेला महापालिका निवडणूक लढण्याची इच्छा होती. याचाच फायदा उचलून काही मंडळींनी प्रशांतच्या मनात गैरसमजूत निर्माण केली. त्यातूनच ही हत्या झाली असल्याचे तपासात पुढे आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Manoj Mhatre murder case: Extension of filing nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.