Mansukh Hiren Murder Case: मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई एटीएसला ठाणे न्यायालयाचा झटका

By जितेंद्र कालेकर | Published: March 24, 2021 09:11 PM2021-03-24T21:11:43+5:302021-03-24T21:14:24+5:30

मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस ) ठाणे न्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. मनसुख हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी दिले आहेत.

Mansukh Hiren Murder Case: Mansukh Hiren Murder Case | Mansukh Hiren Murder Case: मनसुख हिरेन प्रकरणात मुंबई एटीएसला ठाणे न्यायालयाचा झटका

हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे दिले आदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे दिले आदेश विनायक शिंदे आणि नरेश गोरचाही ताबा आता एनआयने घेतला

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मनसुख हिरेन प्रकरणात महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस ) ठाणेन्यायालयाने बुधवारी मोठा झटका दिला. मनसुख हत्या प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात यावे, असे आदेश ठाण्याच्या मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. इंगळे यांनी दिले आहेत. शिवाय, एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि क्रि केट बुकी नरेश गोर या दोन्ही आरोपींचाही ताबा एनआयएकडे देण्याचेही आदेश दिले.
मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवावा असे आदेश केंद्र सरकारने २० मार्च २०२१ रोजी महाराष्टÑ एटीएसला दिले होते. मात्र, राज्य सरकारने परवानगी दिली नसल्याचे कारण दाखवत एटीएसने हा तपास एनआयएकडे सोपविला नव्हता. त्यामुळेच २४ मार्च रोजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया अनिल सिंग आणि अ‍ॅड. संदेश पाटील यांनी एनआयएची ही सर्व बाजू ठाणे न्यायालयात मांडली. एटीएसने हा मनसुख हत्या प्रकरणाचा तपास थांबवावा. तो एनआयए अ‍ॅक्टच्या सेक्शन ६ आणि ८ नुसार एनआयएकडे हस्तांतरित करण्याची मागणी न्यायालयात केली होती. सेक्शन ९ नुसार राज्य सरकार अर्थात एटीएस यामध्ये केवळ सहाय्य करु शकते, असाही युक्तिवाद करण्यात आला. सर्व बाजू ऐकल्यानंतर न्या. इंगळे यांनी मनसुख हत्या प्रकरणाचा तपास एटीएसने थांबवून तो सर्व कागदपत्रांसह एनआयएकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. शिवाय, एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि क्रि केट बुकी नरेश गोर या दोघांचाही ताबा एनआयए कडे सोपवावा, असेही आदेश दिले. एटीएसची बाजू अ‍ॅड. अनिता सुपारे यांनी मांडली. यावेळी एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम कलाटे, एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे आदी उपस्थित होते.
* विक्रोळी येथून मनसुख हिरेन यांची मोटार चोरीचा गुन्हा, अंटालिया येथे मनसुख यांच्या मोटारीमध्ये मिळालेले जिलेटीन आणि मनसुख यांची हत्या अशा तीन गुन्हयांपैकी मोटार चोरीचा गुन्हा संपला. अंटालियाजवळ जिलेटीनची मोटार मिळाल्याचा तपास एनआयएकडे होता. याच गुन्हयाशी संलग्न असलेल्या मनसुख यांचा मृतदेह मुंब्रा खाडी येथे मिळाल्याने हाही तपास एनआयएकडे मिळावा, अशी मागणी एनआयएने न्यायालयात केली होती.
दरम्यान, शिंदे आणि गोर या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना तसेच या गुन्हयाची कागदपत्रे एनआयएकडे सोपविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दोनच दिवसांपूर्वी एटीएसने सचिन वाझे यांचा मनसुख हत्या प्रकरणात प्रमुख सहभाग असून त्यांचा ताबा एनआयएकडून घेण्यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचे म्हटले होते. तत्पूर्वीच न्यायालयाने या तपासासह आरोपींनाही न्यायालयामार्फत आपल्या ताब्यात घेतल्याने एटीएसला ही मोठी चपराक असल्याचे बोलले जाते.
 

‘केंद्र सरकारने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. परंतू, एटीएसने तो वर्ग केला नव्हता. अखेर मुंबईतील अंटालिया इमारतीजवळ मिळालेली स्फोटकांची मोटार आणि हिरेन खून प्रकरण एकमेकांशी निगडीत असल्याने या तपासाची मागणी एनआयएने केली होती. ती न्यायालयाने मान्य केली.’
अ‍ॅड. संदेश पाटील, एनआयएचे वकील, मुंबई.
 

Web Title: Mansukh Hiren Murder Case: Mansukh Hiren Murder Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.