CoronaVirus: ठाणे जिल्ह्यात ५८ नवे रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या ८६१
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:37 AM2020-04-30T05:37:06+5:302020-04-30T05:37:16+5:30
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक २३ रुग्ण सापडल्याने तेथील रु ग्णसंख्या २७९ झाली आहे. तर, कल्याण डोंबिवलीत बुधवारीही मुंबईतील एका पोलिसासह शासकीय रुग्णालयातील दोन नर्स आणि एका आरोग्य कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
ठाणे : जिल्ह्यात बुधवारी ५८ नवीन रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णांची संख्या ८६१ झाली आहे. यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक २३ रुग्ण सापडल्याने तेथील रु ग्णसंख्या २७९ झाली आहे. तर, कल्याण डोंबिवलीत बुधवारीही मुंबईतील एका पोलिसासह शासकीय रुग्णालयातील दोन नर्स आणि एका आरोग्य कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ठाणे ग्रामीणमधील एका कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
५८ रुग्णांमध्ये ठाणे २३, कल्याण-डोंबिवली-१३, बदलापूर-३, नवी मुंबई १८ आणि ठाणे ग्रामीण १ यांचा समावेश असून भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मीरा भार्इंदर येथे एकही नवीन रुग्ण आढळला नाही. ठामपा क्षेत्रातील एकूण रुग्ण २७९ झाले असून नवी मुंबई-२०६, केडीएमसी-१५६, मीरा भार्इंदर-१५२, बदलापूर-२५, भिवंडी-१२ अंबरनाथ-६ व ग्रामीण भाग २२ अशी एकूण रुग्णसंख्या ८६१ झाली आहे. ठामपा क्षेत्रात आढळलेल्या २३ रुग्णांमध्ये १३ पुरुष तर १० महिला आहेत. आतापर्यंत ५२ जण कोरोनामुक्त झाले असून २१८ जण उपचार घेत आहेत. तसेच केडीएमसीत सापडलेल्या १३ रुग्णांपैकी ९ रुग्ण डोंबिवली आणि ४ रुग्ण हे कल्याण येथील आहेत. यात ८ पुरुष असून ५ महिला आहेत. येथे ४६ जण कोरोनामुक्त झाले असून १०७ जणांवर उपचार सुरू आहेत.
>आतापर्यंत २२ मृत्यू
ठाणे ग्रामीण भागातील एका ४४ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा मंगळवारी रात्री ठाणे जिल्हा सामान्य रु ग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला न्यूमोनिया असल्याचे सांगितले जाते. ठाणे ग्रामीण भागातील ही पहिली मृत्यूची घटना असून जिल्ह्यातील ती २२ वी घटना असल्याची माहिती सूत्रांनी दिली.