मराठा आरक्षण : सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा निर्णय, मराठा समाजाने व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 02:00 AM2019-06-28T02:00:36+5:302019-06-28T02:01:08+5:30

मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवताच मराठा समाजातील तरुणतरुणींनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला.

 Maratha Reservation: The decision that should be kept written in the golden age, the sentiments expressed by the Maratha community | मराठा आरक्षण : सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा निर्णय, मराठा समाजाने व्यक्त केली भावना

मराठा आरक्षण : सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा असा निर्णय, मराठा समाजाने व्यक्त केली भावना

Next

ठाणे : मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये अनुक्रमे १२ व १३ टक्के आरक्षण लागू करण्याचा विधिमंडळाने मंजूर केलेला निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवताच ठाण्यातील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी मराठा समाजातील तरुणतरुणींनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना कार्यकर्त्यांनी वंदन केले. आजचा निकाल ही सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्याची घटना असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत एकमेकांना लाडू भरवले. त्यानंतर, हातातील भगवा ध्वज आसमंतात उंच धरून नाचवत कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला.
या निर्णयामुळे मराठा समाजातील गोरगरीब मुलांना उच्च शिक्षणाची कवाडे खुली होतील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. हे सर्वस्वी आरक्षणाच्या मागणीकरिता निघालेल्या मराठा मोर्चाचे यश असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. सकल मराठा समाजाचे दत्ता चव्हाण, रमेश आंब्रे, सूर्यराव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मराठा समाजाला मिळणाºया आरक्षणाचा लाभ धनदांडग्यांनी न लाटता तो खरोखरच समाजातील गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. सरकारी नोकऱ्यांमधील मराठा समाजाचा बॅकलॉग लागलीच भरण्याची मागणी तरुणतरुणींनी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना दत्ता चव्हाण यांनी आता आरक्षण मिळाले आहे. ते भविष्यात टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच कोपर्डीतील त्या भगिनीला न्यायही मिळाला पाहिजे. शेतकºयांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
ठाण्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गतवर्षी विशाल मोर्चा काढण्यात आला होता.

ठाण्यात उत्साह

ठाणे : सकल मराठा समाजाच्या पदाधिकाºयांनी मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर ठाण्यातील तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ढोलताशा वाजवून नाचून जल्लोष केला. यावेळी लाडूंचे वाटप करून एकमेकांचे तोंड गोड केले. याप्रसंगी सकल मराठा समाजाचे दत्ता चव्हाण, रमेश आंब्रे, सूर्यराव आदी उपस्थित होते.

मराठा आरक्षण न्यायालयात वैध ठरणार किंवा कसे याबाबत ठाण्यातील मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये सकाळपासून प्रचंड उत्सुकता होती. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर यावर चर्चा सुरु होती. दुपारी अनुकूल निकाल लागल्यावर सोशल मीडियावर शुभेच्छा तसेच एकमेकांचे अभिनंदन करण्याचे संदेश पसरले.
 

Web Title:  Maratha Reservation: The decision that should be kept written in the golden age, the sentiments expressed by the Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.